वार्षिक १० लाखाचं उत्पन्न असणाऱ्यांना गॅस सबसिडी नाही
By Admin | Updated: December 28, 2015 18:28 IST2015-12-28T18:08:09+5:302015-12-28T18:28:35+5:30
वार्षिक १० लाखाचे किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना गॅसचे अनुदान नाही मिळनार नाही, हा नियम १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येईल.

वार्षिक १० लाखाचं उत्पन्न असणाऱ्यांना गॅस सबसिडी नाही
ऑनलाइन लोकमत
नई दिल्ली , दि. २८ - वार्षिक १० लाखाचं किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना गॅसचे अनुदान नाही मिळनार नाही, हा नियम १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येईल. नोंदणी असणाऱ्या ग्राहकाचे किंवा त्याच्या पती किंवा पत्नीचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांवर असेल, तर जानेवारी महिन्यापासून अशा ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत. केंद्र सरकारने आज हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच ह्या योजनेचं परिपत्रक लवकरच निघेल.
यापूर्वी सरकारकारने स्वताच्या इच्छेने एलपीजी गॅस वर मिळणारे अनुदान दुसऱ्यानां देण्याच अव्हान केले होते. आतापर्यंत ५७ लाख ग्राहकांनी स्वेच्छेने गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे