‘विमा एफडीआयवर दुटप्पीपणा नाही’
By Admin | Updated: August 6, 2014 02:59 IST2014-08-06T02:59:02+5:302014-08-06T02:59:02+5:30
गेली सहा वर्षे भाजपाने विमा विधेयकाला कडाडून विरोध केला़ आता सत्तेत येताच हे विधेयक पारित करून घेण्यासाठी भाजपा प्रयत्नांची पराकाष्ठा करते आह़े

‘विमा एफडीआयवर दुटप्पीपणा नाही’
नवी दिल्ली : गेली सहा वर्षे भाजपाने विमा विधेयकाला कडाडून विरोध केला़ आता सत्तेत येताच हे विधेयक पारित करून घेण्यासाठी भाजपा प्रयत्नांची पराकाष्ठा करते आह़े सरकारच्या या भूमिकेतून अहंकाराचा दर्प येतो, अशा शब्दांत काँग्रेसने आज मंगळवारी विमा विधेयकाच्या मुद्दय़ावर सरकारला धारेवर धरल़े विमा विधेयकावर पक्ष दुटप्पीपणा दाखवत असल्याचा आरोप काँग्रेसने या वेळी फेटाळून लावला़
आज मंगळवारी संसद भवन परिसरात बोलताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विमा विधेयकावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली़ माङया मते, विमा विधेयकावर आम्ही कुठल्याही प्रकारे दुटप्पीपणा दाखवलेला नाही़ आम्ही एफडीआयचे समर्थन केले आह़े आम्ही एफडीआय आणले तेव्हा 2क्क्8मध्ये भाजपानेच त्याला विरोध केला होता़ आम्ही आणू इच्छित असलेलेच विमा दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडले असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होत़े मात्र रालोआ सरकारने यात व्यापक फेरबदल केले आहेत, असे ते म्हणाल़े