सूर्यनमस्कार आणि नमाज यात फरक नाही : आदित्यनाथ
By Admin | Updated: March 30, 2017 01:53 IST2017-03-30T01:53:18+5:302017-03-30T01:53:18+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्य नमस्कार आणि नमाजामध्ये

सूर्यनमस्कार आणि नमाज यात फरक नाही : आदित्यनाथ
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्य नमस्कार आणि नमाजामध्ये साम्य असल्याचं म्हटलं आहे. सूर्य नमस्काराचे आसन आणि मुस्लिम बांधवांची नमाज पढण्याची प्रक्रिया मिळती जुळती आहे असं ते म्हणाले.
सूर्य नमस्काराचे आसन आणि मुस्लिम बांधवांच्या नमाज पढण्याच्या प्रक्रियेत साम्य आहे पण आतापर्यंत सत्तेत असलेल्यांनी सूर्य नमस्कार आणि नमाज यांना कधी जोडण्याचा प्रयत्न केला नाही. सत्तेत असलेल्यांना योग नाही तर "भोग"ची सवय होती. राजधानी दिल्लीत आयोजीत 3 दिवसीय योग महोत्सवात योगी बोलत होते. यावेळी त्यांनी योगाचं महत्व सांगितलं. (वृत्तसंस्था)