शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
3
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
4
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
5
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
7
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
8
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
9
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
10
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
11
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
12
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

चीन-पाकिस्तानकडून धोका नाही, देशातच मोठा चोर बसलाय - फारूख अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 2:40 PM

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला उद्देशून असे विधान केले आहे की ज्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, दि. 17 - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला उद्देशून असे विधान केले आहे की ज्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. चीन किंवा पाकिस्तानपेक्षा भारतातच असे काहीजण आहेत ज्यांपासून देशाला धोका आहे, असे विधान फारूख अब्दुल्ला यांनी एका कार्यक्रमात केले आहे. 'भारताला देशाबाहेरुन धोका नाही. चीन आणि पाकिस्तान भारताचे काहीही वाकडं करू शकत नाही. तर देशातच मोठा चोर बसला आहे, तोच सर्व काही बिघडवत आहे', असे वादग्रस्त विधान फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे. या वक्तव्याद्वारे अब्दुल्ला यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.      यावर राजकारणातील विरोधकांचं असे म्हणणे आहे की, अब्दुल्ला यांनी असे विधान करत पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांना एकप्रकारे क्लीन चिटच दिली आहे, जे भारतविरोधी कारवाया करत आले आहेत.  नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या आयोजित कार्यक्रमात फारूक अब्दुल्ला बोलत होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि जेडीयूचे शरद यादवदेखील उपस्थित होते. 

अब्दुल्ला पुढे असेही म्हणाले की, ''यात कोणतीही शंका नाही की मी मुसलमान आहे आणि मी गर्वाने सांगतो की मी एक भारतीय मुसलमान आहे. आज भारताला बाहेरुन धोका नाही. चीन आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. पाकिस्तानही आपले काहीही वाईट करू शकत नाही. देशातच चोर बसला आहे, जो सर्व काही बिघडवत आहे''

वाचा आणखी बातम्या (पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा)('इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी )(केरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली) 

मोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधीदरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर धोरणावर हल्ला करत सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळेच पाकिस्तानला कुरापती करण्याची संधी मिळाल्याची टीका केली. राहुल गांधी यांनी सांगितले की, 'मोदी सरकारमुळे पाकिस्तानला आधीच समस्यांना तोंड देत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये चुकीच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या भाषणामध्ये केलेल्या काश्मीरच्या उल्लेखावर बोलताना राहुल गांधी यांनी ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', असं नरेंद्र मोदी बोलले होते. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, 'त्यांनी जम्मू काश्मीरध्ये हिंसा आणि द्वेष पसरवला आहे. यामुळे पाकिस्तानचा फायदा झाला आहे'. राहुल गांधी यांनी यावेळी दावा केला आहे की, त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत मिळून कोणताही तमाशा किंवा ड्रामा न करता काश्मीरच्या मुद्द्यावर काम केलं होते. 'पी चिदंबरम आणि जयराम रमेशसारख्या नेत्यांनी काश्मीरसाठी 10 वर्ष काम केलं, पण मोदी सरकारने त्यांचे हे सर्व प्रयत्न वाया घालवले आहेत', अशीही टीका राहुल गांधींनी केली आहे.