पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही
By Admin | Updated: December 2, 2014 16:24 IST2014-12-02T11:19:51+5:302014-12-02T16:24:01+5:30
रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के व रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के व रिव्हर्स रेपो रेट ७ तर कॅश रिझर्व्ह रेशो ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. महागाईच्या दरात घट झाल्याने व्याज दरात कपात होण्याची शक्यता होती मात्र केंद्र सरकारच्या दबावानंतरही रिझर्व्ह बँकेने व्याज दर कमी करण्यास नकार दिला आहे.
धनाच्या किमतीमुळे आणि सोन्याच्या आयातीत झालेल्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर वित्तीय तूट आटोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदर कपात होणार का याकडे सरकार, उद्योग व शेअर बाजाराचे लक्ष लागले होते.