ठोकता नाही आला षटकार!
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:18+5:302015-02-11T00:33:18+5:30
नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून तळ ठोकून असलेल्या पाच महारथींना यावेळी विजयाचा षटकार ठोकता आला नाही. भाजपचे जगदीश मुखी, साहबसिंग चौहान, काँग्रेसचे चौधरी मतीन अहमद, हारुन युसूफ आणि शोएब इक्बाल यांचे सहाव्यांदा विजयाचे स्वप्न भंगले. गेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीची हवा असतानाही या पाच जणांना पाचव्यांदा निवडणूक जिंकता आली होती. मतीन अहमद आणि हारुन युसूफ यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

ठोकता नाही आला षटकार!
न ी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून तळ ठोकून असलेल्या पाच महारथींना यावेळी विजयाचा षटकार ठोकता आला नाही. भाजपचे जगदीश मुखी, साहबसिंग चौहान, काँग्रेसचे चौधरी मतीन अहमद, हारुन युसूफ आणि शोएब इक्बाल यांचे सहाव्यांदा विजयाचे स्वप्न भंगले. गेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीची हवा असतानाही या पाच जणांना पाचव्यांदा निवडणूक जिंकता आली होती. मतीन अहमद आणि हारुन युसूफ यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.------------------------डाव्यांची अनामत जप्त डाव्या आघाडीतील सातही पक्षांच्या सर्व १५ उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. त्यापैकी एकाही उमेदवाराला एक हजार मतेही मिळवता आली नाहीत. बाडली मतदारसंघातीलएसयुसीआय-सी चे राकेश कुमार यांनाच केवळ ९४७ म्हणजे हजारच्या आसपास मते मिळवता आली. चार उमेदवार वगळता उर्वरित मतदारांना ५०० मतांचा आकडाही ओलांडता आला नाही. फॉरवर्ड ब्लॉकचे राकेश शर्मा यांना केवळ ५२ तर हरिशंकर शर्मा यांना ४८ मते मिळाली.