वाघाला घरी ठेवण्यासाठी कायदा करण्याची गरज

By Admin | Updated: March 1, 2015 23:50 IST2015-03-01T23:50:52+5:302015-03-01T23:50:52+5:30

लोकांना सिंह, वाघ यासारख्या वन्यप्राण्यांना घरात पाळीव प्राण्यांप्रमाणे ठेवता यावे यासाठी कायदा बनविण्याची विचित्र मागणी मध्य प्रदेशचे पशुपालन

There is a need for a law to keep Vaghala home | वाघाला घरी ठेवण्यासाठी कायदा करण्याची गरज

वाघाला घरी ठेवण्यासाठी कायदा करण्याची गरज

नवी दिल्ली : लोकांना सिंह, वाघ यासारख्या वन्यप्राण्यांना घरात पाळीव प्राण्यांप्रमाणे ठेवता यावे यासाठी कायदा बनविण्याची विचित्र मागणी मध्य प्रदेशचे पशुपालन, फलोद्यान व अन्नप्रक्रियामंत्री सुकूम मेहदळे यांनी केली आहे. वाघांच्या संरक्षणासाठी असा कायदा करणे आवश्यक आहे.
मेहदळे यांनी मध्य प्रदेशच्या वन विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. थायलंडसारख्या आग्नेय आशियाई देशांत व काही आफ्रिकी देशांत अशा प्रकारचा कायदा असल्याचा हवाला देत त्यांनी असा कायदा भारतातही बनविण्याची मागणी यात केली आहे. ज्या देशांमध्ये असा कायदा आधीपासूनच आहे, त्या देशांमध्ये वाघ आणि सिंहांची संख्या वाढण्यास मोठी मदत झाली, असा दावा त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: There is a need for a law to keep Vaghala home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.