शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण नाही', अल्पसंख्याक आरक्षणावर स्मृती इराणींचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 17:22 IST

'युपीएने कमकुवत विधेयक आणले होते, आम्ही मजबूत विधेयक मांडले.'

Women's reservation bill: विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. दिग्गज नेते या विधेयकावर आपले मत मांडत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी  (Smriti Irani) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, अल्पसंख्यांक आरक्षणावरही भाष्य केले.

‘विरोधक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत’काँग्रेसवर हल्लाबोल करताना भाजप नेत्या म्हणाल्या की, 'त्यांच्याकडे सत्ता होती पण त्यांनी देशाला लुटले, अन्यथा ही घोषणा फार पूर्वीच झाली असती. यूपीए सरकारने कमकुवत विधेयक आणले होते. विरोधक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. वस्तुस्थिती रेकॉर्डवर येणे महत्त्वाचे आहे. राज्यघटनेच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, महिला आरक्षण विधेयकाद्वारे (देवी) लक्ष्मीने घटनात्मक रूप धारण केले आहे. मातृशक्ती हे शासनाचे केंद्र असावे अशी पंतप्रधानांची इच्छा होती. महिला सक्षमीकरण हा पंतप्रधान मोदींचा संकल्प आहे,' असं स्मृती इराणी म्हणाल्या. 

"अनेक लोक श्रेय घेण्यासाठी येतात"सोनिया गांधी यांचे नाव न घेता स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. काही लोक हे विधेयक आमचे असल्याचे सांगत आहेत. आमच्यामुळे बिल आहे, असे काही लोक म्हणत आहेत. आरक्षण ही मोदींची 15 वर्षांची गॅरंटी आहे. बरेच लोक श्रेय घेण्यासाठी येतात. पंतप्रधानांसाठी महिला सक्षमीकरण ही केवळ योजना नाही. 2014 पासून ते महिलांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी काम केले. अल्पसंख्याकांनाही आरक्षण द्यावे, अशी मागणी काही लोक करत आहेत, मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असे घटनेत म्हटले आहे,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीSonia Gandhiसोनिया गांधीWomen Reservationमहिला आरक्षणParliamentसंसद