शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

या गावात वीस वर्षांपासून पोलीस ठाण्यात नाही कोणतीही तक्रार, हरयाणात बिढाईखेडा गावात बंधुभावाचा नवा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 15:17 IST

गावातील प्रत्येक प्रकरण सहमतीने किंवा पंचायतीच्या बैठकीत सोडविले जाते. गावाची लोकसंख्या जवळपास ७५० आहे. येथे १२५ घरे आहेत.

बलवंत तक्षक 

चंदिगड : हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात बिढाईखेडा गावात बंधुभावाचा आदर्श गावकऱ्यांनी निर्माण केला आहे. गत २० वर्षात या गावात ना कधी भांडण झाले ना पोलीस ठाण्यात तक्रार गेली. राज्याचे पंचायत व ग्रामीण विकास मंत्री देवेंद्र सिंह बबली हे याच गावचे आहेत. गावातील प्रत्येक प्रकरण सहमतीने किंवा पंचायतीच्या बैठकीत सोडविले जाते. गावाची लोकसंख्या जवळपास ७५० आहे. येथे १२५ घरे आहेत. जाट बाहुल्य असलेल्या या गावात सहा वॉर्ड आहेत. तर, ३७९ मतदार आहेत. बिढाईखेडा गावात २०१० मध्ये प्रथमच ग्रामपंचायतीची स्थापना झाली होती. यापूर्वीही हे गाव डांगरा पंचायतीशी जोडलेले होते. या गावाने पहिल्या वेळी कलावती यांना सर्व सहमतीने सरपंच निवडले होते. २०१६ मध्ये गावातील लोकांनी रामचंद्र बराला यांना सरपंच निवडले आणि निश्चित केले की, कोणतेही प्रकरण असो, पोलीस ठाण्यात जाण्याऐवजी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मध्यस्थीने आणि सहमतीने प्रकरणावर तोडगा काढला जावा. बराला यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात जाण्याबाबत ग्रामस्थ विचारही करत नाहीत. गत दोन दशकांपासून हीच परंपरा सुरु आहे.  

टॅग्स :HaryanaहरयाणाPoliceपोलिस