शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:17 IST

Uttar Pradesh News: गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या विविध राज्यातील नेत्यांची विधाने आणि कृती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्यामुळे पक्षावर सातत्याने नामुष्की ओढवत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ऊर्जामंत्री ए.के. शर्मा यांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या विविध राज्यातील नेत्यांची विधाने आणि कृती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्यामुळे पक्षावर सातत्याने नामुष्की ओढवत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ऊर्जामंत्री ए.के. शर्मा यांचा असाच एक व्हिडीओ समोर आला असून, या व्हिडीओमुळे ते चांगलेच अडचणीत आले आहे. या व्हिडीओमध्ये काही ग्रामस्थ त्यांच्यासमोर विजेची समस्या मांडताना दिसत आहेत. मात्र ग्रामस्थांची समस्या ऐकल्यावर मंत्रिमहोदय हात जोडून उभे राहत जय श्री राम, जय हनुमान अशा घोषणा देत जयजयकार करत निघून जातात, असं दृश्य चित्रित झालं आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे ऊर्जा मंत्री ए. के. शर्मा हे सुल्तानपूर जिल्ह्यातून जात होते. तेव्हा त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला व्यापाऱ्यांच्या एका समुहाने स्वागत करण्यासाठी थांबवले. मंत्रिमहोदय त्यांच्या कारमधून उतरले तेव्हा व्यापारी आणि सर्वसामान्य लोकांनी त्यांनी फुलांच्या माळा घालून त्यांचे स्वागत केले. एवढं जंगी स्वागत पाहून मंत्रिमहोदयही भारावून गेले. याचदरम्यान, काही व्यापाऱ्यांनी त्या भागात असलेल्या विजेच्या अनियमित पुरवठ्याबाबतची समस्या मंत्रिमहोदयांसमोर मांडली. तसेच आपल्या मागण्या असलेलं एक पत्रकही त्यांना दिलं.

साहेब, आमच्याकडे वीज येत नाही. २४ तासांपैकी केवळ ३ तासच वीज येते. अधिकारीही ऐकून घेत नाहीत, आता तुम्हीच काही तरी करा, अशी विनंती  उपस्थितांपैकी काही ग्रामस्थांनी मंत्र्यांकडे केली. त्यावर मंत्रिमहोदयांनी दोन्ही हात जोडून वीजप्रश्नामध्ये लक्ष घालतो, पाहूया सअशे सांगितले. त्यानंतर जय श्री राम, जय श्रीराम, जय हनुमान अशा घोषणा देत ते पुढे रवाना झाले. तसेच उपस्थित लोकही त्यांच्यामागून घोषणा देऊ लागले. त्यामुळे आता ग्रामस्थांच्या विजेच्या समस्येचं निराकरण कसं काय होतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाelectricityवीज