राममंदिरासाठी सध्याच दबाव आणणार नाही
By Admin | Updated: October 18, 2014 00:02 IST2014-10-18T00:02:56+5:302014-10-18T00:02:56+5:30
अयोध्येत राममंदिर बांधण्याबाबत रा.स्व. संघ सध्याच नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आणण्यास इच्छुक नाही.

राममंदिरासाठी सध्याच दबाव आणणार नाही
लखनौ : अयोध्येत राममंदिर बांधण्याबाबत रा.स्व. संघ सध्याच नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आणण्यास इच्छुक नाही. हा मुद्दा भाजपाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट असून, केंद्र सरकारकडे 2019 र्पयतचा वेळ आहे, असे संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी स्पष्ट केले.
राममंदिराचा मुद्दा भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात अंतभरूत आहे. तो देशाच्या अजेंडय़ावर असून देशहिताचा आहे. राममंदिरासाठी धर्माचार्य आणि विहिंपच्या आंदोलनाचे आम्ही समर्थन केले आहे. राममंदिराचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी भाजपा कायदा आणण्याची भाषा करीत आला आहे. आता केंद्रात स्पष्ट बहुमतातील सरकार बनल्यामुळे संघ याबाबत कोणती मागणी करणार? यावर ते म्हणाले की, सरकार आपल्या प्राधान्यानुसार काम करणार आहे. अजून सरकारकडे 2क्19 र्पयत वेळ आहे. संघाच्या त्रिदिवसीय अ.भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. या बैठकीत देशाच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली असून अल-कायदा आणि आयएसआयएसच्या आव्हानांबाबत मी तपशीलात जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले. लव्ह जिहादच्या मुद्यावर उत्तर टाळले. (वृत्तसंस्था)