शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून यंदा लोकसभेच्या निकालास विलंब होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 12:27 IST

अंतिम निकाल येणार उशीर होणार असल्याची निवडणूक आयोगाची माहिती

नवी दिल्ली: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काय होणार याची देशाला उत्सुकता देशाला आहे. त्यामुळेच अनेक जणांचं लक्ष 23 तारखेकडे लागलं आहे. मात्र यंदा अंतिम निकाल येण्यास उशीर होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. देशभरातील लोकसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर होण्यास थोडा विलंब होईल. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या पडताळणीमुळे अंतिम निकाल उशिरा लागेल, असं आयोगानं सांगितलं आहे. निवडणूक आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना निकालास उशीर लागणार असल्याचं सांगितलं. यंदा अंतिम निकाल जाहीर होण्यास 4-5 तासांचा उशीर होईल. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीमुळे हा विलंब होणार असल्याचं जैन म्हणाले. यंदा मतदानावेळी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्यामुळे मतदान केल्यावर मतदाराला एक पावती दिसली. त्यात मत कोणाला देण्यात आलं याची माहिती होती. ईव्हीएमबद्दलच्या तक्रारी येत असल्यानं व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्यामुळे यंदा मतमोजणी करताना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात येईल.प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या किमान पाच मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी करण्याचे आदेश गेल्याच महिन्यात न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. हा आदेश आयोगानं मान्य केला. न्यायालयानं यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीत पाचपट वाढ केली आहे. प्रत्येक मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटची ईव्हीएमसोबत पडताळणी करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे. सध्या केवळ एका व्हीव्हीपॅटची ईव्हीएमसोबत पडताळणी केली जाते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVVPATव्हीव्हीपीएटी