पारिजातनगर येथेही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: October 10, 2016 00:48 IST2016-10-10T00:27:13+5:302016-10-10T00:48:01+5:30
नाशिक : समर्थनगर आणि पारिजातनगर भागात काही युवकांच्या जमावाने नागरिकांना अडवून मारहाण करण्याबराबेरच काही मोटारींच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केल्याने याभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

पारिजातनगर येथेही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न
नाशिक : समर्थनगर आणि पारिजातनगर भागात काही युवकांच्या जमावाने नागरिकांना अडवून मारहाण करण्याबराबेरच काही मोटारींच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केल्याने याभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.
महात्मानगर ते लोकमत सर्कलपर्यंतच्या भागात उच्चभ्रूंची वसाहत असून, या भागात अशाप्रकारे यापूर्वी कधीही गैरप्रकार घडले नव्हते. यंदा मात्र एका युवकांच्या जमावाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, गंगापूररोड भागातही पंपिंग स्टेशनच्या जवळ म्हणजेच चिंतामणी मंगल कार्यालयासमोर बसवर दगडफेक करण्यात आली.