शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमधील 107 आमदार करणार भाजपात प्रवेश, मोठ्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 17:25 IST

लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमतासह केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपाने विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये व्यापक स्तरावर पक्षांतराची मोहीम हाती घेतली आहे.

कोलकाता - लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमतासह केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपाने विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये व्यापक स्तरावर पक्षांतराची मोहीम हाती घेतली आहे. गोव्यात काँग्रेसच्या आमदारांचा गट पक्षात सामावून घेतल्यानंतर आणि कर्नाटकात सत्ताधारी आमदारांच्या बंडाला प्रोत्साहन दिल्यानंतर आता भाजपानेपश्चिम बंगालकडे मोर्चा वळवल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि काँग्रेस या पक्षांचे मिळून सुमारे 107 आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपा नेते मुकुल रॉय यांनी सांगितले. कोलकाता येते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला. ''पश्चिम बंगालमधील सीपीएम, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे मिळून सुमारे 107 आमदार लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या संभाव्य आमदारांची यादी आम्ही तयार केली असून, हे आमदार आमच्या संपर्कात आहेत.''असे मुकुल रॉय यांनी सांगितले. 

मे महिन्यात आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत यश मिळवले होते. पश्चिम बंगालमधून भाजपाचे 18 खासदार निवडून आले होते. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये असलेली संभाव्य संधी पाहून भाजपाने तृणमूल काँग्रेसला थेट आव्हान देण्यास सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये भजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक घटना घडत आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारण