शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

... तेव्हा योगी आदित्यनाथ धाय मोकलून रडले, मोदींकडून उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 13:43 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं.   

ठळक मुद्देपूर्वांचल प्रदेशात अगोदर लहान मुलांमध्ये मेंदूंच्या आजारामुळे विदारक परिस्थिती होती. त्यामुळे, दरवर्षी हजारो मुले मृत्यूमुखी पडत होती. योगी आदित्यनाथ जेव्हा खासदार होते, तेव्हा लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्युंमुळे ते संसदेत धाय मोकलून रडले होते

लखनौ - कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या काही राज्यांतील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. त्यासोबतच, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्संसोबतही चर्चा करत आहेत. मोदींनी आज वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. त्यामध्ये, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं.   

पूर्वांचल प्रदेशात अगोदर लहान मुलांमध्ये मेंदूंच्या आजारामुळे विदारक परिस्थिती होती. त्यामुळे, दरवर्षी हजारो मुले मृत्यूमुखी पडत होती. योगी आदित्यनाथ जेव्हा खासदार होते, तेव्हा लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्युंमुळे ते संसदेत धाय मोकलून रडले होते. या लहान मुलांना वाचविण्याची विनंतीपूर्ण मागणी ते करत होते. मात्र, योगी आदित्यनाथ जेव्हा मुख्यमंत्री बनले, तेव्हा केंद्र सरकारसोबत एकत्र येऊन त्यांनी मेंदूंच्या आजारासाठी उपायांचं अभियान राबवलं. सद्यस्थिती कित्येक लहानग्यांना वाचविण्यात आपल्याला यश आलंय, असे मोदींनी म्हटले. 

ब्लॅक फंगसचा सामना करूया

जहाँ बिमार, वहाँ उपचार.. हा आपला नवा मंत्र आहे. या सिद्धांतानुसार मायक्रो कंटेंटमेंट झोन बनवून आपण गावागावत औषधे वाटत आहात, ही कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागात हे अभियान अधिकपणे व्यापक करायचं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता ब्लॅक फंगसच्या नवीन आजाराचा सामना आपल्याला करायचा आहे. या नव्या स्ट्रेनला निपटण्यासाठी सावधानी आणि योग्य ती व्यवस्था करण्यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं.   

आरोग्य व्यवस्थेवर ताण

कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या लाटेत लढताना अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागला आहे. यावेळी संक्रमणाचा वेग पहिल्यापेक्षा अधिक आहे. तसेच, रुग्णांना जास्त दिवस रुग्णालयात राहावे लागत आहे. या सर्व बाबींमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलाय, असेही मोदींनी म्हटलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी