शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
2
विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार?
3
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
4
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
5
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
6
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
7
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
8
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
9
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
10
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
11
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
12
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
14
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
15
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
16
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"
17
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई!
18
निवडणुकीत मराठी मतं मिळाली नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपला अजूनही..."
19
"हॅलो फ्रॉम Melodi टीम", जॉर्जिया मेलोनी आणि PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली...
20
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचे 'मेलोडी टीम...' सोशल मीडियावर ट्रेंड; PM मोदींनी दिली अशी रिअ‍ॅक्शन

... तर अख्ख्या जगाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करू; रशियाची भारतातून उघड धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 10:36 PM

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या समरकंदमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीतही यावर चर्चा झाली

युक्रेनवरून रशिया विरुद्ध पश्चिमेकडील देश अशा दोन गटांत जग विभागले गेले आहे. भारतासारखे देश रशियाची आणि अमेरिकेची साथ सोडण्यास तयार नाहीएत. अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिलेली असताना रशियाने जगाला थेट कच्च्या तेलाचा संपूर्ण जगाचा पुरवठाच बंद पाडण्याची धमकी दिली आहे. 

जगातील सात विकसित देशांची संघटना जी-७ ने रशियाच्या कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय दरांपेक्षा कमी करण्याचा घाट घातला आहे. या किंमती आंतरराष्ट्रीय दरांपेक्षा खाली आणून एक निश्चित अशी पातळी ठरविण्यात येणार आहे. जर असे झाले तर अख्ख्या जगाचा पुरवठा बंद पाडण्याची धमकी रशियाने दिली आहे. महत्वाचे म्हणजे ही धमकी रशियाचे भारतातील राजदूत डेनिस एलिपोव यांनी दिली आहे. 

शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ही धमकी दिली. युरोपीय देश मोठ्या प्रमाणावर रशियाकडून आजही तेल खरेदी करत आहेत. मात्र, दुसऱ्या देशांना ते रशियाकडून तेल खरेदी करू नका असे सांगत आहेत. यामुळे भारताने जी-७ देशांचा हा सल्ला मानू नये, असे एलिपोव म्हणाले. जी-7 देश रशियाच्या तेल विक्रीवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याची किंमत निश्चित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना भारताने पाठिंबा द्यायला हवा असा त्यांचा प्रयत्न आहे. कारण भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत आहे. 

आमच्यावर तेलाच्या किंमतीची बंधने घातली तर जगाचा पुरवठा रोखू, यामुळे कच्च्य़ा तेलाच्या किंमती वाढतील. याचा फटका जगाला बसेल, असेही एलिपोव म्हणाले. खरेदीदार आणि पुरवठादार यांचे हित लक्षात घेऊन दोन्ही देशांतील कंपन्या या संदर्भातील सौदे करत आहेत. दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य अधिक दृढ होईल. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या समरकंदमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीतही यावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :Crude Oilखनिज तेलRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया