...तर मग आम्हीही सोडणार नाही, राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला ठणकावले
By Admin | Updated: October 11, 2016 15:55 IST2016-10-11T15:52:22+5:302016-10-11T15:55:55+5:30
आम्ही कुणालाही डिवचणार नाही, मात्र जर आम्हाला कुणी डिवचले तर त्याला सोडणार नाही, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.

...तर मग आम्हीही सोडणार नाही, राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला ठणकावले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली , दि. 11 - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. आम्ही कुणालाही डिवचणार नाही, मात्र जर आम्हाला कुणी डिवचले तर त्याला सोडणार नाही, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. दसरा सणानिमित्त लखनऊमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संवाद साधताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक करत त्यांनी, 'भारताने बलवान राष्ट्र असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या काही दिवसांत भारताने आपले सामर्थ्य सिद्ध करुन देश बलवान असल्याचे जगाला दाखवून दिले आहे', असे देखील राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.
आणखी बातम्या
'तेव्हा वाजपेयींनी लष्कराला LoC ओलांडण्यापासून रोखले'
लुधियानात 'नवाज शरीफ'रुपी रावणाचे होणार दहन