शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

...तर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याला देऊ मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा, जेडीएस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 21:07 IST

आमदारांच्या बंडखोरीमुळे अडचणीत आलेले कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार टिकवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

बंगळुरू - आमदारांच्या बंडखोरीमुळे अडचणीत आलेले कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार टिकवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जर सरकार टिकवण्यासाठी दोन्ही पक्षांमधील समन्वय समितीने सिद्धारमय्या यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे निश्चित केले तर सिद्धामय्या यांनाही पाठिंबा देण्यास आमचा नकार नसेल, असे वक्तव्य जेडीएसचे नेते जी.टी. देवेगौडा यांनी केले आहे. कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटावर प्रतिक्रिया देताना जी.टी. देवेगौडा यांनी सांगितले की, ''जर दोन्ही पक्षांमधील समन्वय समितीने सरकार वाचवण्यासाठी सिद्धारमय्या यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचे निश्चित केले तर त्याला आमचा नकार नसेल. काँग्रेसकडूनही सरकात टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनीही आपल्या काही ज्येष्ठ नेत्यांना कॅबिनेटमधून राजीनामा देण्यास सांगितले आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा देत मुंबईकडे कूच केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आमदारांच्या राजीनामा नाट्यामुळे काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार संकटात आले असून, सरकार टिकवण्यासाठी एच.डी. कुमारस्वामी यांनी धावाधाव सुरू केली आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी कुमारस्वामी अमेरिकेहून तातडीने भारतात परतले आहेत. तसेच काँग्रेसकडूनही आपल्या असंतुष्ट आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. बंगळुरू येथे पोहोचल्यानंतर कुमारस्वामी हे पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. तसेच आमदारांसोबतही चर्चा करतील.  दरम्यान, काँग्रेसनेही आपल्या आमदारांच्या दलाची बैठक 9 जुलै रोजी बोलावली आहे. त्यासाठी पक्षाने एक सर्क्युलर प्रसिद्ध केले आहे. तसेच या बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच या बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीला माजी मुख्यमंत्री सिद्घारामय्या, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव आणि कर्नाटकचे प्रभारी के.सी. वेणुगोपाल हे उपस्थित असतील.  कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्याने आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेले एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. या घडामोडींनी कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आले असून, सरकार वाचविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकावण्यासाठी भाजपाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.कर्नाटकातलं सरकार अल्पमतात आलं असून, काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवरही संकट घोघावतंय. शनिवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. सर्व 10 आमदार मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसनं या आमदारांशी संपर्क साधू नये, यासाठीही भाजपा प्रयत्नशील आहे. मुंबईत आलेल्या आमदारांमध्ये 7 काँग्रेसचे, तीन जेडीएसचे आहेत. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)