शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

"तेव्हा सत्ताधाऱ्यांना आपल्याच संस्कृतीची लाज वाटत होती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका; इतिहास पुसून प्रगती शक्य नाही

गुवाहाटी : ‘स्वातंत्र्यानंतर सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांना धार्मिक स्थळांचे महत्त्व समजले नाही आणि राजकीय कारणांमुळे त्यांना आपल्याच संस्कृतीची लाज वाटत होती,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे ११,६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी केली. 

मोदी म्हणाले की, कोणताही देश इतिहास पुसून प्रगती करू शकत नाही. तथापि, गेल्या दहा वर्षांत परिस्थिती बदलली आहे. सुरू केलेले प्रकल्प केवळ ईशान्येकडीलच नव्हे, तर उर्वरित दक्षिण आशियाशीही दळणवळण मजबूत करतील. गेल्या दहा वर्षांत आसाममध्ये शांतता परत आली आहे आणि ७,०००हून अधिक लोक शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात परतले आहेत. गेल्या दशकात विक्रमी संख्येने पर्यटकांनी या भागाला भेट दिली आहे.

‘असाममाला’ प्रकल्प नेमका काय आहे ?nपंतप्रधानांनी ‘असाममाला’ रस्त्यांच्या दुसऱ्या प्रकल्पाचेही लोकार्पण केले. nया टप्प्यात एकूण ३४४४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने ४३ नवीन रस्ते आणि ३८ काँक्रीट पूल बांधले जातील.

११,६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांनी खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात सुमारे ११,६०० कोटी रुपयांच्या राज्य आणि केंद्राच्या अनुदानित पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण केले. 

त्यामध्ये कामाख्या मंदिर कॉरिडॉर (४९८ कोटी रुपये), विमानतळ टर्मिनलपासून सहा पदरी रस्ता (३५८ कोटी), नेहरू स्टेडियममध्ये सुधारणा (८३१ कोटी) आणि चंद्रपूर येथे नवीन क्रीडा संकुलाचा (३०० कोटी) समावेश आहे.

विपश्यनेमुळे जीवनातील तणाव, समस्या दूर होतील nविपश्यना ही प्राचीन भारताची एक अनोखी देणगी तसेच आधुनिक विज्ञान आहे, ज्याद्वारे तरुण आणि वृद्ध लोकांना जीवनातील तणाव आणि समस्यांना तोंड देण्यासाठी मदत होऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. nविपश्यना गुरू एस. एन. गोयंका यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या डिजिटल भाषणात मोदी म्हणाले की, ध्यान आणि विपश्यना हे एकेकाळी त्यागाचे माध्यम म्हणून पाहिले जात होते; परंतु आता ते व्यावहारिक जीवनात व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम बनले आहे. विपश्यनेची शिकवण समस्यांवर उपाय शोधण्यात मदत करू शकते. विपश्यना हा आत्मनिरीक्षण ते आत्मपरिवर्तन असा प्रवास आहे आणि आजच्या सर्व आव्हानांवर उपाय आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा