शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: ...तर मोदींना २०२३ च्या मध्यावर पंतप्रधान पद सोडावे लागेल; सुब्रमण्यम स्वामींचे खळबळजनक ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 19:38 IST

एनएसए अजित डोवाल यांना हटवण्याची मागणी, भाजपा नेत्याचे गंभीर आरोप.

भाजपचे फायरब्रँड, अनेकदा आपल्याच पक्षाविरोधात कारवाया करणारे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एनएसए अजित डोवाल यांना हटवण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास पंतप्रधान मोदींना 2023 च्या मध्यात पद सोडावे लागू शकते, असा इशारा स्वामी यांनी दिला आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. 

पेगासस टेलिफोन टॅपिंगसारखी चूक डोवाल यांनी अनेकदा केली आहे, असे सांगताना स्वामी यांनी अजित डोवाल यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच मोदींनी डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून काढून टाकावे, असेही म्हटले आहे. अदानी समूहाच्या संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करायला हवे, असेही स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. 

काँग्रेसने अदानीशी कधीच करार केला नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना सुब्रमण्यम स्वामी यांनी हे म्हटले होते. मी त्यांच्यापैकी अनेकांना ओळखतो ज्यांचे अदानीसोबत अनेक सौदे आहेत, पण मला काँग्रेसची पर्वा नाही. भाजपचे पावित्र्य अबाधित रहावे, अशी माझी इच्छा आहे, असे स्वामी म्हणाले होते. 

डोवाल यांच्याबाबत स्वामी नेमके काय म्हणाले...''मोदींनी डोवाल यांना त्यांच्या NSA पदावरून हटवले पाहिजे. पेगासस टेलिफोन टॅपिंग आणि वॉशिंग्टन डीसी मधून येणार्‍या आणखी एक भयानक गोष्टींसह त्यांनी बर्‍याच वेळा मूर्खपणा केला आहे. अन्यथा २०२३ च्या मध्यापर्यंत मोदींनाही पद सोडावे लागेल.'', असे ट्विट स्वामी यांनी केले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीAjit Dovalअजित डोवाल