मग मोदींनीही पुन्हा शपथ घ्यावी
By Admin | Updated: November 24, 2015 00:04 IST2015-11-24T00:04:18+5:302015-11-24T00:04:18+5:30
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप मंत्रिपदाची शपथ घेताना चुकले आणि विरोधकांनी त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली.

मग मोदींनीही पुन्हा शपथ घ्यावी
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप मंत्रिपदाची शपथ घेताना चुकले आणि विरोधकांनी त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली. विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवारी खुद्द लालूप्रसाद हेच मैदानात उतरले. पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदीही चुकले होते, मग त्यांनाही पुन्हा शपथ घ्यायला लावा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
लालू प्रसादांनी सोमवारी टिष्ट्वटर अकाऊंटवर थेट मोदींच्या शपथविधी सोहळ्याचा व्हिडिओ शेअर करत, मोदींनी शपथविधीवेळी चुकीचा शब्द उच्चारल्याचे लक्षात आणून दिले.