...तर मी राजीनामा देईन - अखिलेश यादव

By Admin | Updated: October 24, 2016 11:36 IST2016-10-24T11:23:00+5:302016-10-24T11:36:07+5:30

मी नवीन पक्ष काढणार अशी लोकांमध्ये चर्चा सुरु आहे, कोण नवीन पक्ष काढणार आहे ?. मी नवीन पक्ष काढणार नाही.

... then I will resign - Akhilesh Yadav | ...तर मी राजीनामा देईन - अखिलेश यादव

...तर मी राजीनामा देईन - अखिलेश यादव

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. २४ - मी नवीन पक्ष काढणार अशी लोकांमध्ये चर्चा सुरु आहे, कोण नवीन पक्ष काढणार आहे ?. मी नवीन पक्ष काढणार नाही असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी स्पष्ट केले. समाजवादी पक्षांतर्गत सुरु असलेल्या गृहकलहाच्या पार्श्वभूमीवर लखनऊ येथील सपाच्या मुख्यालयात महत्वाची बैठक सुरु आहे. 
 
नेताजींनी अन्याय विरोधात लढायला शिकवले. नेताजींनी राजीनामा द्यायला सांगितला तर मी राजीनामा देईन असे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सांगितले. मला जेव्हा दुस-यांकडून समजले की, तुम्ही मला पदावरुन हटवणार आहात, तेव्हा मला दु:ख झाले. हा तुमचा पक्ष आहे यात माझे काहीही नाही असे अखिलेश म्हणाले. 

आणखी वाचा 
समाजवादी पक्षात 'यादवी', अखिलेश-शिवपाल समर्थक भिडले
 
काही लोक पक्षात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे माझ्या विरोधात कारस्थान आहे. जे नेताजी आणि माझ्या विरोधात कारस्थान रचत आहेत त्यांच्या विरोधात मी कारवाई करायला मागे-पुढे पाहणार नाही असे अखिलेश यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये अमरसिंह यांनी अखिलेश पुन्हा मुख्यमंत्री बनणार नाहीत असे विधान केले होते. त्याचे वाईट वाटले. हे विधान रामगोपाल यादव यांनी केले नव्हते असे अखिलेश यांनी सांगितले. 
 

Web Title: ... then I will resign - Akhilesh Yadav