...तर भारतावर आण्विक हल्ला करू- संरक्षण मंत्री,पाकिस्तान

By Admin | Updated: September 18, 2016 22:50 IST2016-09-18T22:50:46+5:302016-09-18T22:50:46+5:30

उरी येथील दहशतवादी हल्ल्यातून भारत सावरत नाही तोच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर आण्विक हल्ल्याची धमकी

... then do nuclear attack on India - Defense Minister, Pakistan | ...तर भारतावर आण्विक हल्ला करू- संरक्षण मंत्री,पाकिस्तान

...तर भारतावर आण्विक हल्ला करू- संरक्षण मंत्री,पाकिस्तान

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.18- उरी येथील दहशतवादी हल्ल्यातून भारत सावरत नाही तोच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'जर आमच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला किंवा कोणी आमच्या हद्दीत पाऊल ठेवलं तर आण्विक हल्ला करायला आम्ही मागे-पुढे पाहणार नाही'.

जर भारताने आमच्या सुरक्षेला  धोका निर्माण केला किंवा आमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर आण्विक हल्ला करण्यासाठीही आम्ही घाबरणार नाही. काश्मीर प्रश्न हा चर्चेनेच सोडवला जाऊ शकतो, दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापीत होण्यासाठी काश्मीर प्रश्न सुटणं गरजेचं आहे. पाकिस्तानने अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेकदा धमकी देण्यात आली आहे. 

Web Title: ... then do nuclear attack on India - Defense Minister, Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.