शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...तर, राष्ट्रपती भवन, संसद भवनही नष्ट करा , ताजमहालचा वाद, सपाचे महासचिव आझम खान संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:28 IST

राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि लाल किल्ला यांसारखी स्मारकेही नष्ट करायला हवीत. तीसुद्धा ताजमहालप्रमाणे ‘गुलामगिरीची प्रतीके’ आहेत, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे महासचिव आजम खान यांनी संताप व्यक्त केला.

रामपूर : राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि लाल किल्ला यांसारखी स्मारकेही नष्ट करायला हवीत. तीसुद्धा ताजमहालप्रमाणे ‘गुलामगिरीची प्रतीके’ आहेत, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे महासचिव आजम खान यांनी संताप व्यक्त केला. भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी सोमवारी ताजमहालच्या इतिहासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर, आझम खान यांनी हा टोला लगावला आहे.इतिहासातून मुगल शासकांना हटविण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन केले जाईल, असे सोम यांनी म्हटले होते. हाच धागा पकडून आझम खान म्हणाले की, मला असे वाटते की, गुलामगिरीची सर्व प्रतीके नष्ट करायला हवीत. फक्त ताजमहलच का? संसद, राष्ट्रपती भवन, कुतुबमीनार आणि लाल किल्ला यांना हटवायला पाहिजे. ही सर्व गुलामगिरीची प्रतीके आहेत. आझम खान म्हणाले की, जर भाजपा आणि सोम हे ताजमहलला भारताचा वारसा म्हणून स्वीकारत नसतील, तर भाजपा आमदारांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह स्मारक उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे यायला हवे.भारतमातेच्या सुपुत्रांच्या रक्त, घामातून उभारला आहे ताजमहालताजमहाल कोणी आणि का उभारला, याला महत्त्व नाही, तर भारतमातेच्या सुपुत्रांनी आपल्या रक्त आणि घामातून हा ताजमहाल उभारला आहे, हे महत्त्वाचे आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे २६ आॅक्टोबर रोजी ताज नगरीत जाणार आहेत. पर्यटनाच्या योजनांची ते समीक्षा करणार आहेत. ते म्हणाले की, आग्रा येथे जाणाºया पर्यटकांना सुरक्षा आणि सुविधा देणे उत्तर प्रदेश सरकारचे कर्तव्य आहे. आम्ही आग्रा शहरासाठी ३७० कोटी रुपयांची योजना तयार केली आहे.

टॅग्स :Taj Mahalताजमहालyogi adityanathयोगी आदित्यनाथ