...तर सीबीआय कोलमडून पडेल
By Admin | Updated: April 27, 2016 04:43 IST2016-04-27T04:43:01+5:302016-04-27T04:43:01+5:30
सीबीआयमध्ये कर्मचाऱ्यांची खूपच कमतरता असून, विविध राज्यांतून आम्हाला अधिकाधिक कर्मचारी मिळणे गरजेचे आहे

...तर सीबीआय कोलमडून पडेल
नवी दिल्ली : सीबीआयमध्ये कर्मचाऱ्यांची खूपच कमतरता असून, विविध राज्यांतून आम्हाला अधिकाधिक कर्मचारी मिळणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास आमची संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडेल, असा इशारा सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी दिला आहे.
संसदीय समितीपुढे सीबीआयची बाजू मांडताना ते म्हणाले की गेल्या काही वर्षांत सीबीआयकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांकडूनही अधिक प्रकरणे आमच्याकडे येत आहेत. वर्षांला सुमारे ७00 प्रकरणांचा तपास करण्याची आमची क्षमता असताना तपासासाठी येणाऱ्या प्रकरणांची संख्या मात्र दुप्पट झाली आहे. आजच्या आमच्याकडे देशातील १२00 आणि परदेशांतील ६२ प्रकरणे तपासासाठी आहेत. त्यापैकी ३१ प्रकरणे गेल्या तील वर्षांपासून आमच्याकडे पडून आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
अनिल स्निहा यांनी समितीला सांगितले की विविध राज्यांतून तसेच केंद्रीय तपास यंत्रणांतून अधिक काळासाठी आणि अधिक काळ काम करू शकणारे अधिकारी देण्यात यावेत
>४एकीकडे तपासासाठी येणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढत असताना सीबीआयमधील रिक्त जागांची संख्या मात्र १५३१ वर पोहोचली आहे. आम्हाला ७२२४ पदांची मान्यता असताना इतक्या जागा रिक्त राहिल्याचा परिणाम तपासावर होत आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.
४त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संसदीय समितीने रिकामी पदे भरण्याबाबत केंद्र सरकारने लवकर आढावा, घ्यावा, असे सुचवले आहे. एवढी पदे रिकामी असल्याबद्दल समितीने तीव्र चिंताही व्यक्त केली.