शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

... तर मग चिनी अ‍ॅपप्रमाणेच 'नमो अ‍ॅप'वरही बंदी घाला; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 15:52 IST

देशात बॅन केलेल्या 59 चीनी अ‍ॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत.

मुंबई -  केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे. त्यानंतर, काँग्रेसने भाजपाला टार्गेट केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारकडे आणखी एका अॅपवरबंदी घालण्याची मागणी केली आहे. 

देशात बॅन केलेल्या 59 चीनी अ‍ॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या चीनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाने निवडणूक प्रचार कॅम्पेनमध्ये लाँच केलेल्या नमो अ‍ॅपवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. ''देशातील 130 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे, म्हणून सरकारने ५९ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अ‍ॅपदेखील बंद केले पाहिजे,'' असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपाला लक्ष्य करत, एकप्रकारे 59 चीनी अॅपवरील बंदीच्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. 

दरम्यान, यापूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे सुरु करण्यात आलेल्या नमो अ‍ॅपवरील डेटाच्या कथित गैरवापराबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर केलेल्या तपासणीत या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांनी दिलेल्या 22 मुद्द्यांची माहिती थर्ड पार्टीला पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वापरकर्त्याचे लोकेशन, छायाचित्रे , कॉन्टॅक्स, मायक्रोफोन आणि कॅमेरा अशा गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय, पीएमओ इंडिया या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांनी दिलेल्या 14 मुद्द्यांची माहिती परस्पर इतरांना पुरवली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे 'सिटीझन एंगेजमेंट अ‍ॅपप' आणि 'माय गव्हर्नमेंट अ‍ॅपप' या दोन्हींच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचे साधारण 9 तपशील थर्ड पार्टीपर्यंत पोहोचत असल्याचेही समोर आले. 

'नमो अ‍ॅपप'च्या माध्यमातून वापरकर्त्यांना भाजपा सरकारच्या कामगिरीबद्दल माहिती दिली जाते. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा ऑडिओ उपलब्ध करून दिला जातो. मात्र, @fs0c131y या ट्विटर हँडलच्या माध्यमातून नमो अ‍ॅपपच्या कार्यपद्धतीविषयी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 'दि इंडियन एक्स्प्रेस'ने अधिक चौकशी केली असता हे ट्विटर अकाऊंट रॉबर्ट बाप्टिस्ट या फ्रेंच सुरक्षा तज्ज्ञाचे आहे. रॉबर्ट बाप्टिस्ट यांच्या म्हणण्यानुसार नमो अ‍ॅपपवरील डेटा अमेरिकास्थित क्लेव्हर टॅप या कंपनीला पुरवला जातो. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMumbaiमुंबईTwitterट्विटर