....तर हिंदू धर्म स्वीकारेन, मुस्लिम महिलेची धमकी
By Admin | Updated: April 13, 2017 10:25 IST2017-04-13T10:08:13+5:302017-04-13T10:25:22+5:30
पतीसहीत सासरची मंडळी घरात प्रवेश देत नसल्याने संतापलेल्या एका मुस्लिम महिलेनं त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे

....तर हिंदू धर्म स्वीकारेन, मुस्लिम महिलेची धमकी
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ट्रिपल तलाक प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने आज पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपवली. सर्वोच्च न्यायालयाचेसरन्यायाधीश खेहर यांच्या खंडपीठासमोर तिहेरी तलाकप्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी हा निर्णय सुनावला.
ट्रिपल तलाक प्रकरणी फक्त कायदेशीर मुद्द्यावरच सुनावणी होईल. सर्व पक्षकारांची बाजू न्यायालय विचारात घेईल. ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला प्रकरणी येणाऱ्या याचिकांवर खंडपीठाकडे सुनावणी होईल. ही सुनावणी 11 मेपासून घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश खेहर यांच्या खंडपीठाने सांगितले.
हत्या होण्यापेक्षा, तीन शब्द बरे...
वैयक्तिक कायदे हे घटनेचे उल्लंघन करणारे आहेत असे म्हणून त्यांना आव्हान देता येत नाही. जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे, असे या मुस्लिम बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.