हनुमान मंदिरातील चांदीच्या मूर्तीची चोरी
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:37+5:302015-01-22T00:07:37+5:30
हनुमान मंदिरातील चांदीच्या मूर्तीची चोरी

हनुमान मंदिरातील चांदीच्या मूर्तीची चोरी
ह ुमान मंदिरातील चांदीच्या मूर्तीची चोरीनागपूर : सार्वजनिक हनुमान मंदिर आणि गणेश मंदिरातील चांदीची मूर्ती आणि मुकुट असा ८ ते १० हजाराचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने सोमवारी रात्री ८ ते मंगळवारी सकाळी ८ दरम्यान चोरून नेल्या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणोबा वाडी, कबाडी लाईन येथे सार्वजनिक हनुमान मंदिर आणि गणेश मंदिर आहे. या मंदिरातील चांदीची मूर्ती अज्ञात आरोपीने चोरून नेली. या प्रकरणी शामानंद सत्यनारायण गोरे (४८) रा. अशोकनगर, प्लॉट नं. १६१, वैशालीनगर रोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.