नंदनवनमध्ये जबरी चोरी

By Admin | Updated: July 7, 2015 22:56 IST2015-07-07T22:56:07+5:302015-07-07T22:56:07+5:30

Theft in Paradise | नंदनवनमध्ये जबरी चोरी

नंदनवनमध्ये जबरी चोरी

>नागपूर : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील २० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून लुटारू पळून गेले. हसनबाग येथे आठवडी बाजारात सोमवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. अलका कृष्णराव राऊत (वय ३८, रा. प्रशांत नगर) या शेजारच्या तीन महिलांसोबत हसनबाग आठवडी बाजारातून भाजीपाला घेऊन घरी जात होत्या. नंदनवनमधील साई श्रद्धा मोबाईल शॉपीजवळ अचानक एका आरोपीने अलका यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. काही अंतरावर पल्सर (टीसीडी/०४९) घेऊन त्याचा साथीदार उभा होता. त्यावर बसून आरोपी पळून गेला. अलका यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला.
---

Web Title: Theft in Paradise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.