नांदेड-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चोरी

By Admin | Updated: July 21, 2016 01:45 IST2016-07-21T01:40:38+5:302016-07-21T01:45:56+5:30

नांदेड-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चोरी

Theft in the Nanded-Mumbai Express | नांदेड-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चोरी

नांदेड-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चोरी

 नाशिकरोड : नांदेड-मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दोन प्रवाशांचे लॅपटॉप, मोबाईल असा ५० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
देवगिरी एक्स्प्रेसमधून मंगळवारी मध्यरात्री प्रवास करणारे रजनीश विजयप्रकाश शर्मा रा. हॅप्पीहोम कॉलनी द्वारका यांचा १७ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीस गेला. तर दुसरे प्रवासी राजेश राजप्पा स्वामी यांचे दोन टॅब व मोबाईल असा ३० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. दोन्ही प्रवाशांना मनमाड रेल्वेस्थानक सोडल्यानंतर लॅपटॉप, टॅब, मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून तो मनमाड रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
नांदेड डॉ. भालचंद्र नगर येथे राहाणारे डॉ. अनिल शेषराव दिघावकर हे गेल्या शनिवारी नांदेड-मुंबई देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. औरंगाबाद ते नाशिक प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी डॉ. दिघावकर यांच्या ३३ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. रेल्वेमध्ये प्रवाशांचे सामान, मौल्यवान वस्तु, रोख, मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनेमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षितेचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Theft in the Nanded-Mumbai Express