मांजरी येथील चोरीचा तपास शून्य

By Admin | Updated: June 12, 2015 17:37 IST2015-06-12T17:37:58+5:302015-06-12T17:37:58+5:30

बार्‍हाळी : मौजे मांजरी येथे १ जून रोजी रात्री झालेल्या धाडसी चोरीचा अद्यापही तपास लागला नाही़ तपास चालू आहे, एवढेच परवलीचे उत्तर पोलिसांकडून दिले जाते़

Theft on the cats is zero | मांजरी येथील चोरीचा तपास शून्य

मांजरी येथील चोरीचा तपास शून्य

र्‍हाळी : मौजे मांजरी येथे १ जून रोजी रात्री झालेल्या धाडसी चोरीचा अद्यापही तपास लागला नाही़ तपास चालू आहे, एवढेच परवलीचे उत्तर पोलिसांकडून दिले जाते़
मांजरी येथील बिरबल नाईक यांच्या घरी चोरी झाली़ चोरट्यांनी साडेबारा तोळे सोने व एक मोटरसायकल लांबविली़ या घटनेची तिरतसर फिर्याद बार्‍हाळी चौकीत देण्यात आली़ घटना घडल्यानंतर सात तासांनी पोलिस पोहचले़ तथापि तपास मात्र १२ दिवसानंतरही लागला नाही़
कोट
निसर्गाचा कोप झालेला असताना घरात चोरी होवून आमच्या आयुष्याची पुंजी संपली़ पोलिस या घटनेकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत़ बार्‍हाळीचे सपोउपनि तर फोनही घेत नाहीत - बिरबल नाईक़
तपास चालू आहे़ यापेक्षा जास्त काही संागू शकत नाही - बनसोडे, सपोउपनि़

किनवट व मांडवी भागात पाऊस
किनवट : १० जूनच्या सायंकाळी किनवट व मांडवी भागात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला़ शेतकरी थोडेफार समाधानी झाले़ किनवट मंडळात ३८ मि़मी़, बोधडी ४ मि़मी़, जलधरा १ मि़मी़, इस्लापूर ८ मि़मी़, मांडवी ३० मि़मी़, शिवणी ५ मि़मी़ पाऊस झाला़ सरासरी १२़२८ टक्के पावसाची नोंद झाली़

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
निवघा बाजार : चक्री ता़हदगाव येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना १० जून रोजी रात्री घडली़
बेबीताई साहेबराव सूर्यवंशी असे मयत महिलेचे नाव आहे़ रात्री गाढ झोपेत असताना महिलेच्या पायावरून उंदीर पळाला़ उंदराच्या मागे साप लागला़ महिलेने पायाला झटका लागल्याने सापाला धक्का लागला़ याच सापाने महिलेच्या पायास चावा घेतला़ महिलेने उंदीर चावला असे म्हणून दुर्लक्ष केले़ मात्र जास्त त्रास होत असल्याने पतीस उठवून रात्रीच नांदेडला आणण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे़

शिवाजी विद्यालयाचा ८० टक्के निकाल
बारूळ : येथील शिवाजी माध्यमिक व उच्च मा़विद्यालयाचा दहावीचा निकाल ८० टक्के लागला़ ९७ पैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ यात वैष्णवी रमेश वडजे हिने ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला़ अंकिता कळकीकर ही ९० टक्के गुण घेवून द्वितीय तर शुभांगी राजकुमार ठाकूर ही ८४ टक्के गुण घेवून तिसरी आली़ याबद्दल विद्यार्थ्यांचे अनेकांनी कौतुक केले़

Web Title: Theft on the cats is zero