नृत्य महोत्सवात दिग्गजांच्या नृत्याची रंगत

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:32+5:302015-02-11T00:33:32+5:30

फोटो स्कॅन हेडिंगप्रमाणे

Theater of the dance drama at the dance festival | नृत्य महोत्सवात दिग्गजांच्या नृत्याची रंगत

नृत्य महोत्सवात दिग्गजांच्या नृत्याची रंगत

टो स्कॅन हेडिंगप्रमाणे
- नवोदित वैदर्भीय व आंतरराष्ट्रीय कलावंतांचा संगम : स्वरसंगम संस्थेचा उपक्रम
नागपूर : स्वरसंगम सांस्कृतिक मंचच्या वतीने द्वितीय संगीत नृत्य महोत्सवाचे आयोजन १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात करण्यात येत आहे़ या महोत्सवात मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या वैदर्भीय संगीत नृत्य स्पर्धेतून निवडण्यात आलेले नवोदित कलावंत व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत एकाच व्यासपीठावर कलाविष्कार सादर करणार असल्याचे सुप्रसिद्ध भरतनाट्यम् कलावंत किशोर हम्पीहोळी यांनी पत्रपरिषदेत सांगितले़ यावेळी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक चंद्रकांत पिंपळघरे व सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना किशोरी हम्पीहोळी प्रामुख्याने उपस्थित होते़
या त्रिदिवसीय महोत्सवात रोज सायंकाळी ६ वाजता भारतीय संस्कृतीशी जुळलेल्या विविध शास्त्रीय कलांची उधळण होणार आहे़ विदर्भातील कलावंतांना शास्त्रीय कलेचे ज्ञान मिळावे आणि त्याद्वारे त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी स्वरसंगम सांस्कृतिक मंच गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत आहे़ महोत्सवात मागील वर्षी घेण्यात आलेल्या विदर्भस्तरीय शास्त्रीय, उपशास्त्रीय, गायन, शास्त्रीय वादन, नृत्य स्पर्धेतील विजेत्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे़ त्यात १३ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय गायक कोल्हापूरचे सुधीर पाटे यांचे गायन होणार आहे़ तसेच अहमदाबाद येथील नृत्य कला कंेद्राच्या नृत्यांगना व नागपूरच्या किशोर नृत्य निकेतनचे विद्यार्थी भरतनाट्यम् सादर करतील़ त्यांच्यासोबत विदर्भातले सौरभ देवधर तबलावादन व राधिका पालमवार शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. १४ फेब्रुवारी रोजी विदर्भातील वैदेही गावंडे व मीनल खापरे (कत्थक), अबोली गद्रे व अविनाश कन्नाके (शास्त्रीय गायन), राहुल रेणकंुटलवार व ऐश्वर्या सहस्रबुद्धे (उपशास्त्रीय गायन) आणि किशोर नृत्य निकेतनचे विद्यार्थी संपदा राजने यांच्यासोबत नृत्यकला सादर करतील़ यावेळी आसामचा ढोलकीवादक फेमस फुकान आपली कला सादर करेल़ १५ फेब्रुवारी रोजी धारवाड येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं़ कैवल्य कुमार यांचे गायन होईल़ त्यानंतर श्री. के़ श्रीराम व किशोर नृत्य निकेतनचे विद्यार्थी आपली कला सादर करतील़ यावेळी ऋषिकेश सिंगरवाडे याचे तबलावादन होईल़ याप्रसंगी संस्थेचे डॉ. सतीश दंडे उपस्थित होते.

Web Title: Theater of the dance drama at the dance festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.