शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जग एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 07:09 IST

मोदी म्हणाले, लोकशाहीची जननी या नात्याने संवाद व लोकशाहीवादी विचारांवर आमचा अनंत काळापासून विश्वास आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज जी-२०मध्ये जवळपास अर्धे जग एकवटले होते. त्यावेळी त्यांनी सर्वांना आशेचा नवा किरण दाखवत भारत कोणत्या मार्गाने विकास करत आहे, याची काही उदाहरणे दिली. भारत ही श्रद्धा, अध्यात्म व परंपरांच्या विविधतेची भूमी असून, जगातील अनेक मोठ्या धर्मांनी येथे जन्म घेतला आहे; तसेच जगातील प्रत्येक धर्माला येथे सन्मान मिळाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी जी-२० शिखर परिषदेत शनिवारी केले. 

मोदी म्हणाले, लोकशाहीची जननी या नात्याने संवाद व लोकशाहीवादी विचारांवर आमचा अनंत काळापासून विश्वास आहे. आमचा जागतिक व्यवहार ‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणजेच ‘संपूर्ण जग एक कुटुंब’ या भावनेवर आधारित आहे. हीच भावना प्रत्येकास ‘वन अर्थ’च्या बांधिलकीने जोडते. 

नैसर्गिक शेतीवर भरभारतातील कोट्यवधी शेतकरी आता ‘नैसर्गिक शेती’ करत आहेत. मानवी आरोग्यासह माती आणि पृथ्वीचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठीचे हे मोठे अभियान आहे. आम्ही ‘हरित हायड्रोजन’ उत्पादनासाठी ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान’ सुरू केले. 

ते वचन पूर्ण करा...विकसित देशांनी २०२३ मध्ये ‘पर्यावरण भांडवल’ म्हणून १०० अब्ज डॉलरचे वचन पूर्ण करावे. पर्यावरण सुरक्षेसाठी ‘कार्बन क्रेडिट’वर चर्चा सुरू आहे. ती ‘काय करू नये’ अशी आहे. जी-२० देशांनी एका ‘ग्रीन क्रेडिट पुढाकारा’वर काम सुरू करायला हवे.

चंद्रयानाचा उल्लेखभारताच्या सफल चंद्रयान मोहिमेद्वारे उपलब्ध होणारा डेटा संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त ठरेल. त्यासाठीच भारत ‘जी-२० सॅटेलाइट मिशन फॉर एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट ऑब्झर्वेशन’ सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. 

आफ्रिकन युनियन जी-२०चा नवा स्थायी सदस्य, आता ‘जी-२१’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकन युनियनला जी-२० चे स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मांडला. सर्व सदस्यांच्या सहमतीने ५५ देशांचा गट असलेल्या आफ्रिकन युनियनच्या जी-२० मध्ये समावेशाची घोषणा केली. त्यानंतर आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अजाली असौमानी सदस्य म्हणून आसनस्थ झाले. त्यामुळे जी-२० गट आता जी-२१ झाला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतG20 Summitजी-२० शिखर परिषद