शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 09:28 IST

आज लिहिला जाईल इतिहास...

-त्रियुग नारायण तिवारीअयोध्या : प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. २२) दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश-विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.  सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. 

कसा असेल मुख्य सोहळा? 

  • सकाळी १०:३० वाजल्यापासून निमंत्रितांचे मंदिर परिसरात आगमन होण्यास सुरुवात होईल. केवळ निमंत्रण असलेल्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे.
  • प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा १२:२० वाजता सुरू होईल. अभिजित मुहूर्तावर होणाऱ्या मुख्य पूजेसाठी १२ वाजून २९ मिनिटे व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे व ३२ सेकंदांपर्यंतचा ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त आहे.
  • वाराणसीचे आचार्य गणेश्वर द्रविड व आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वात व १२१ पुरोहित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील वस्त्र काढतील, त्यानंतर डोळ्याला काजळ लावतील, तसेच मूर्तीला सुवर्णवस्त्र परिधान करतील.
  • दुपारी एक वाजता सर्व पूजा-विधी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील.
  • सायंकाळी अयोध्यानगरी  १० लाख पणत्यांनी उजळून निघणार आहे. 

६ दिवसांचे विधी संपन्न

अयोध्येत १६ जानेवारीपासून सुरू झालेले सहा दिवसांचे विधी रविवारी पूर्ण झाले. सकाळी ११४ कलशांतील जलाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मध्याधिवास, शय्याधिवास विधी झाले.

महाराष्ट्रातील रोपांची सजावट

श्रीराम जन्मभूमी संकुलात महाराष्ट्रातून आणलेली विविध फुलांची साडेसात हजार रोपे लावण्यात आली. नक्षत्र वाटिकेत २७ नक्षत्रांशी संबंधित २७ झाडे लावण्यात आली आहे.

राज्यातील आजची सुट्टी उच्च न्यायालयाने केली ओके

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारी रोजी राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुट्टीविरोधात कायद्याचा अभ्यास करणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी दाखल केलेली जनहित याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ती फेटाळली. सुट्टी हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत