शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:15 IST

Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला होता. आता ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्यदलांसोबत सर्वसामान्यांनीही केलेल्या प्रेरणादायी कामगिरीच्या कहाण्या समोर येत आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला होता. आता ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्यदलांसोबत सर्वसामान्यांनीही केलेल्या प्रेरणादायी कामगिरीच्या कहाण्या समोर येत आहेत. गुजरातमधील भारत-पाकिस्तान सीमेपासून २० किमी अंतरावर असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातील जलोय गाव सध्या असाच चर्चेत आहे. भारताच्या हद्दीतील शेवटचा गाव अशी ओळख असलेल्या या गावचे सरपंच थानाभाई डोडिया यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ला येथे होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कराची मदत केल्याने त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थानाभाई डोडिया यांनी सांगितले की, मला लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आलं आहे. त्यासाठी मी भारत सरकार आणि गुजरात सरकारचे आभार मानतो, असे थानाभाई डोडिया म्हणाले.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना जलोया गावातील रहिवाशांनी भारतीय सैन्यदलाला खूप मदत केली होती. जेव्हा लष्कराला मशीनची आवश्यकता होती तेव्हा मशीन पुरवण्यात आल्या. जेव्हा कामगार हवे होते तेव्हा ग्रामस्थ काम करण्यासाठी पुढे सरसारवले. आता या मदतीमुळे आम्हाला हा सन्मान मिळत आहे. मोदींनी आम्हाला ही संधी देऊन आमच्यामध्ये अभिमान निर्माण केला आहे.  आमच्या गावातील ग्रामस्थांचा सुरक्षा दलांसोबत उत्तम ताळमेळ आहे. आम्ही मिळून योजना आखतो आणि एकत्र काम करतो. ग्रामस्थांनी नेहमीच बीएसएफला मदत केली आहे. तसेच त्यांनीही आम्हाला चांगली साथ दिली आहे, असेही सरपंच थानाभाई डोडिया यांनी सांगितले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरGujaratगुजरातIndependence Dayस्वातंत्र्य दिनsarpanchसरपंच