शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

अमेरिकेने गिळला एक रुपया, डॉलरच्या तुलनेत ९९ पैशांनी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 06:33 IST

डॉलरच्या तुलनेत ९९ पैशांनी घसरण; वस्तूंच्या किमती वाढणार

नवी दिल्ली : भारतीय रुपयामध्ये मोठी घसरण गुरुवारी पाहायला मिळाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल ९९ पैशांनी कोसळून आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी म्हणजे ८०.९५ रुपये या पातळीवर आला आहे. बुधवारीही रुपयात २६ पैशांची घसरण झाली होती. रुपया कोसळल्यामुळे आयात महागणार असून, वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होणार आहे.

रुपयाची किंमत का घसरली? अमेरिकेची केंद्रीय बँक ४० वर्षांच्या उच्चांकी महागाई आणि मंदीच्या भीतीने त्रस्त आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी फेडने व्याजदरात सलग तिसऱ्यांदा ०.७५ टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे व्याजदर वाढून ३ ते ३.२५ टक्क्यांवर पाेहोचले. त्याचा परिणाम म्हणून रुपयासह जगभरातील इतर

देशांच्या चलनात घसरण झाली.अमेरिकेत व्याजदर वाढला की तेथील चलन म्हणजेच डॉलरची किंमत वाढते. डॉलर भक्कम होतो. तर दुसरीकडे रुपयासारख्या इतर चलनांची किंमत कमी होते. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढल्यानंतरही रुपया कमकुवत होतो.

शेअर बाजार ३३७ अंकांनी कोसळलाभारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. यामुळे निर्देशांक ३३७ अंकांनी कोसळून बंद झाला. अमेरिकन रिझर्व्हकडून व्याजदरात कठोरपणे वाढ आणि जागतिक स्तरावर कमकुवत झालेली स्थिती याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. आशियासह अन्य बाजारांमध्येही गुरुवारी घसरण दिसून आली. विदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारी ४६१.०४ कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत. याच वेळी कच्चे तेल ९०.८२ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहे.

अमेरिकेत व्याजदर २००८च्या स्तरावर पोहोचलेत. यामुळे मंदी येऊ शकते की नाही हे कोणालाच माहिती नाही, परंतु असे झाले तर ती किती गंभीर असेल?. आपल्याला महागाईवर मात करायची आहे. असे करण्यासाठी वेदना देण्याशिवाय दुसरा पर्याय असता तर किती बरे झाले असते. मात्र असा काही पर्याय दिसत नाही, असे फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी म्हटले आहे.

क्रिप्टोबाजारात हाहाकार

सोने चांदीचे दर सपाट पातळीवर असून, क्रिप्टोबाजारात हाहाकार उडाला आहे. इथेरियम तब्बल ८ टक्क्यांनी कोसळला असून, बिटकॉईनही १८हजार डॉलरच्या जवळ आला आहे.

महागाईमुळे  काय होते?विकासदर मंदावतो. बेरोजगारी वाढते. मंदीची भीती आणखी वाढते.

भारताला फायदा की नुकसान

निर्यातीसाठी फायदा होईल, कारण पेमेंट डॉलरमध्ये होईल.याचा आयटी आणि औषध कंपन्यांना फायदा होईल.

 

 

जगभरात काय घडतेय? स्वित्झर्लंड : मध्यवर्ती बँकेने गुरुवारी व्याजदरात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ केली. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँकेने ही पावले उचलली आहेत. बँकेने व्याजदर वाढून ०.५ टक्के केला आहे, जो आतापर्यंत उणे ०.२५ टक्के होता.जपान : येन चलनाची घसरण रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकेने बाजारात हस्तक्षेप करण्याचे मोठे पाऊल उचलले. येन २४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे.ब्रिटन : ब्रिटनच्या सेंट्रल बँकेनेही महागाई टाळण्यासाठी व्याजदरात पुन्हा एकदा ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे. ही व्याजदरातील २७ वर्षांतील सर्वात मोठी वाढ आहे. राणीच्या निधनामुळे हा निर्णय घेण्यास एक आठवडा उशीर झाला.तुर्की : देशातील महागाई ८० टक्क्यांच्या वर पोहोचूनही तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात १०० बेसिस पॉइंटने कपात करत बाजारांना आश्चर्यचकित केले. येथे रेपो दर १३ वरून १२ टक्के करण्यात आला आहे.

टॅग्स :MONEYपैसाdelhiदिल्ली