शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

महिला मतांसाठी रस्सीखेच; काँग्रेसचे वर्षाला १५ हजार, भाजपचे १२ हजार रुपयांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:42 IST

भूपेश बघेल यांनी भाजपच्या या योजनेला तोडीस तोड योजना लागू करून अधिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

रायपूर : छत्तीसगड विधानसभेच्या २० जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्यात ७० जागांवर मतदान पार पडणार आहे. या टप्प्यावर महिलांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने वर्षाला १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. भाजपने या आधीच महिलांना १२ हजार रुपये देण्याची आश्वासन दिले होते. महिलांची मते खेचण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसत आहे. 

राज्यात काँग्रेस सत्तेत परतल्यास महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना सुरु करून याअंतर्गत महिलांना दरवर्षी १५ हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. बघेल यांनी रविवारी सोशल मीडियावर या घोषणेची माहिती दिली. छत्तीसगडमध्ये भाजपनेही महिलांना दरवर्षाला १२ हजार रुपये देण्याचे आश्वासन याआधी दिले आहे. भाजपने प्रचारात महिलांसाठी ‘महतारी वंदना योजना’ सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. भूपेश बघेल यांनी भाजपच्या या योजनेला तोडीस तोड योजना लागू करून अधिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बघेल यांनी म्हटले आहे की, माझ्या माता-भगिनींनो, छत्तीसगडवर लक्ष्मी मातेने आजवर असीम कृपा केली. जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे आम्ही छत्तीसगडला विकासाच्या पथावर घेऊन चाललो आहोत. जनता गरिबीतून मुक्त व्हावी हा संकल्प समोर ठेवून सरकारने गेली पाच वर्षे अनेक विकासकामे मार्गी लावली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्हाला राज्यातील माता-भगिनी समृद्ध आणि सक्षम झालेल्या आम्हाला पाहायच्या आहेत. (वृत्तसंस्था) 

केवळ विवाहित महिलांसाठीयाआधी भाजपचे नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी ‘महतारी वंदना योजने’साठी अर्ज सोशल मीडिया पोस्टद्वारे जारी केला. त्यात म्हटले होते, राज्यात भाजप सरकार येताच महतारी वंदना योजना लागू केली जाईल. केवळ विवाहित महिलांना याचे लाभ दिले जातील. महिलांनी हे अर्ज भरून भाजपच्या कार्यालयात जमा करावेत.

थेट खात्यात जमा करणारभूपेश बघेल असेही म्हणाले की, लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिनी मी घोषणा करीत आहे की, काँग्रेस सत्तेत परत आल्यास सरकार ‘छत्तीसगड गृहलक्ष्मी योजना’ सुरु करेल. यातून प्रत्येक महिलेला दरवर्षी १५ हजार रुपये दिले जातील. सर्व्हेक्षण करण्यासाठी सरकारच तुमच्या दारात येईल. हे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा केले जातील.

टॅग्स :chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसBJPभाजपा