शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: सणासुदीच्या गर्दीमुळं ट्रेन सुटली, प्रवाशानं तिकिटाचा संपूर्ण परतावा मागीतला! काय सांगतो रेल्वेचा नियम? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 13:42 IST

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि खचाखच भरलेल्या गाड्या दिसत आहेत. या गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण होत आहे.

सूरत - सणासुदीची गर्दी हाताळण्यात अथवा तिचे व्यवस्थापन करण्यात आलेल्या अपयशामुळे भारतीय रेल्वेला पुन्हा  एकदा टीकांचा सामना करावा लागत आहे. कारण दिवाळीसाठी घरी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि खचाखच भरलेल्या गाड्या दिसत आहेत. या गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण होत आहे.

एका प्रवाशाने X वर (आधीचे ट्विटर) एक व्हिडिओ शेअर करत, आपण कन्फर्म तिकीट विकत घेतले होते. मात्र सणासुदीच्या गर्दीमुळे आपल्याला ट्रेनमध्ये प्रवेश करता आला नाही, यामुळे आपली ट्रेन सुटली, असा  दावा या प्रवाशाने केला आहे. एवढेच नाही, तर आपल्या सारख्या अनेक लोकांना ट्रेनमध्ये प्रवेशच करता आला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

संबंधित प्रवाशाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (DRM) वडोदरा यांना टॅग करत लहिले आहे, ‘भारतीय रेल्वेचे व्यवस्थापन अत्यंत खराब आहे. माझी दिवाळी बर्बाद केल्याबद्दल धन्यवाद. थर्ड एसीचे कन्फर्म तिकीट असले तरी आपल्याला हेच मिळते. पोलिसांकडूनही सहकार्य मिळाले नाही. माझ्या सारख्या अनेक प्रवाशांना रेल्वेत बसता आले नाही. माला एकूण 1173.95 रुपयांचा परतावा हवा आहे.’

याशिवाय, "कामगार लोकांच्या गर्दीने मला ट्रेनमधून बाहेर ढकलले, दरवाजे बंद केले आणि कुणालाही ट्रेनमध्ये जाऊ दिले नाही. एवढेच नाही, तर पोलिसांनीही मला मदत करण्यास नकार दिला आणि परिस्थितीवर हसू लागले," असेही संबंधित प्रवाशाने म्हटले आहे. याच बरोबर, DRM वडोदराने सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत, रेल्वे पुलिसांकडे घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काय सांगतो नियम -ट्रेन सुटल्यास आपण आपल्या रिफंडसाठी क्लेम करू शकता. रेल्वेच्या नियमानुसार, जर एखाद्या प्रवाशाची रेल्वे सुटली अथवा 3 तासांहून अधिक लेट झाली, तर आपण तिकट कॅन्सल करून रिफंडसाठी क्लेम करू शकतात. मात्र हा रिफंड मिळविण्यासाठी आपल्याला रेल्वेच्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. याशिवाय आपल्याला रिफंड मिळणार नाही. अशा स्थितीत प्रवाशांना टीडीआर फाइल करून रिफंड मिळवता येऊ शकतो. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासीGujaratगुजरातPoliceपोलिस