शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त ठरला, वऱ्हाडी जमले, पण नवरीने ऐनवेळी फिल्मी स्टाईलमध्ये थांबवलं लग्न, मग झाली प्रियकराची एंट्री, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:26 IST

Marriage: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे लग्नादिवशी लग्न ठरवलेल्या नवऱ्याच्या गळ्यात वरमाला न घालता प्रियकराच्या गळ्यात माळ घातली.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे लग्नादिवशीलग्न ठरवलेल्या नवऱ्याच्या गळ्यात वरमाला न घालता प्रियकराच्या गळ्यात माळ घातली. सोशल मीडियावर ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. लग्न होण्याआधीच मोडले. नवरीने लग्नाचा मुहूर्त जवळ आला असतानाच ऐनवेळी फिल्मी स्टाईलमध्ये नवऱ्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. कुटुंबीयांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मात्र ती तयार झाली नाही. अखेरीस वधूविनाच नवरा आणि वरात माघारी परतली. त्यानंतर वधूने घरी जाण्याऐवजी त्याच ठिकाणी प्रियकराच्या गळ्यात वरमाळा घालून त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

प्रयागराजमधील एका तरुणीचं लग्न याच भागात असलेल्या काजीपूर येथील तरुणासोबत ठरलं होतं. ५ फेब्रुवारी रोजी टिळा लावण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ८ तारखेला मेवालाल बाग येथील एका गेस्ट हाऊसमध्ये लग्न होणार होतं. त्यासाठी वऱ्हाडी मंडळी वाजतगाजत आले. मुहूर्त जवळ आला. विधी सुरू झाले. रात्री १.३० वाजता लग्न लागणार होता.  मात्र ऐन वेळी नवरीने लग्न करण्यास नकार दिला. तिने आपल्याला लग्न करायचे नसल्याचे भटजींना सांगितले. नवरीच्या या पावित्र्यामुळे मंडपात एकच गोंधळ सुरू झाला. समजावण्या, विनवण्या झाल्या मात्र नवरी आपल्या निर्णयावर ठाम होती.

या प्रकारामुळे नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. मात्र दोन्ही पक्ष परस्पर सहमतीने लग्न थांबवण्यास तयार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरुणी सज्ञान असल्याने तिच्या इच्छेविरुद्ध लग्न होऊ शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही.  

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश