शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची पटरी तुटल्यास थेट अधिकाऱ्यांना जाणार मेसेज; CELच्या अभियंत्यांचा अनोखा शोध, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:01 IST

Ghaziabad Train New System News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रेल्वेची पटरी तुटल्यास थेट संबंधित अधिकाऱ्याच्या मोबाईलवर मेसेज जाणार आहे. 

गाझियाबाद : रेल्वे अपघातांची संख्या शून्यावर आणण्यासाठी विविध पातळ्यांवर काम केले जाते. असाच एक प्रयत्न उत्तर प्रदेशातील गाझियाबाद भागात असलेल्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (CEL) या एंटरप्राइझच्या अभियंत्यांनी अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे, ज्याद्वारे रेल्वेची पटरी तुटण्याचा किंवा तडा गेल्याचा मेसेज रेल्वे प्रशासनाला जाईल. अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर तात्काळ याबाबतची माहिती मिळू शकेल.

दरम्यान, या योजनेमुळे रेल्वे अपघात कमी होण्यास नक्कीच मदत होईल. हे तंत्रज्ञान सध्या दिल्ली मेट्रो ट्रेनच्या ट्रॅकवर वापरले जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्याची यशस्वी चाचणीही झाली आहे. आगामी काळात बॉटनिकल गार्डन ते कालकाजी मंदिर स्थानकादरम्यान मेट्रो ट्रेनच्या रुळांवर ते बसवण्यात येणार आहे. यानंतर भारतीय रेल्वेच्या रुळांवरही ते बसवण्याची योजना आखली जाणार आहे. 

हिवाळ्याच्या दिवसांत रेल्वे रुळांना तडे जाण्याचा किंवा तुटण्याचा धोका असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे रेल्वे अपघाताचा धोका निर्माण होतो. या समस्येचा सामना करण्यासाठी CEL च्या अभियंत्यांनी आता ब्रोकन रेल डिटेक्शन सिस्टम (BRDS) विकसित केली आहे. पटरीवरील 500 मीटर अंतरावर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्याच्या कक्षेत येणारा ट्रॅक तुटला किंवा त्याला तडा गेला, तर त्याचा मेसेज रेल्वे अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर लगेच जातो. त्यामुळे रुळांची वेळेत दुरुस्ती करता येईल.  

रेल्वेची पटरी तुटल्यास येणार मेसेजया संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना सीईएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चेतन प्रकाश जैन यांनी म्हटले की, अभियंत्यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत बीआरडीएस ही प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे रुळ तुटण्याची किंवा तडे गेल्याची माहिती लगेच मिळते. दिल्ली मेट्रोच्या ट्रॅकवर त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. दिल्लीतील इतर मेट्रो ट्रॅकवर देखील ते बसवण्यात येणार आहे. या प्रणालीअंतर्गत ट्रॅकला तडा गेल्यास किंवा तुटल्यास अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर तात्काळ मेसेज जाईल. कोणत्याही असामाजिक घटकाने रुळ तोडून रेल्वे अपघात सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचीही माहिती रेल्वे प्रशासनाला मिळणार आहे. रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची मानली जाते. 

अशा प्रकारे काम करेल यंत्रणा ही यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे स्थानकावर नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार असल्याचे चेतन प्रकाश जैन यांनी सांगितले. सर्व ठिकाणी बसविलेल्या बीआरडीएसची माहिती नियंत्रण कक्षाच्या संगणक स्क्रीनवर उपलब्ध होईल. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आले असून हे सॉफ्टवेअर रेल्वे अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर अपडेट केले जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही ठिकाणी रेल्वे रुळ तुटल्यास किंवा तडा गेल्यास त्याचा मेसेज रेल्वे अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर जाईल.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वेtechnologyतंत्रज्ञान