शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या जिभेवर कोल्हापुरातील ठिकपुर्लीच्या बर्फीचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:22 IST

जिल्हा प्रशासनाने पाठवली दहा किलो बर्फी

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील ऐतिहासिक भेटीदरम्यान गुरुवारी मॅक्रॉन यांच्या जिभेवर कोल्हापुरातील ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील अस्सल दुधाच्या गोड बर्फीची चव रेंगाळली. कोणत्याही कृत्रिम रंगाचा वापर न करता तयार झालेल्या या पारंपरिक बर्फीने तपासण्यांचे कडक टप्पे पार केल्यानंतर परदेशी पाहुण्यांना व त्यांच्या शिष्टमंडळाला तृप्त केले.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन हे सध्या भारत दौऱ्यावर असून मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी लोक भवनच्या वतीने भारतभरातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थाची ऑर्डर देण्यात आली होती. अधिकाऱ्यांना कोल्हापुरातील प्रसिद्ध ठिकपुर्लीची बर्फी माहिती होती, त्यानुसार त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे बर्फी पाठविण्यास सांगितले.प्रशासनाने ठिकपुर्लीतून दहा किलो बर्फी बनवून घेतली व रविवारी मुंबईला रवाना केली. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने बर्फीची तपासणी केल्यानंतर फ्रान्सच्या अध्यक्षांच्या गुरुवारच्या मेजवानीत त्याचा समावेश करण्यात आला. कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील या पदार्थाचा गोडवा जागतिक नेत्यांच्या ताटापर्यंत पोहोचल्याने येथील सांस्कृतिक आणि कृषी वारशाचा गौरव झाला आहे.

समोर बसून बनवून घेतली...बर्फीची मागणी येताच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: यात जातीने लक्ष घालून राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर ती बनवून घेण्यास सांगितली. तलाठी जे. एम. शिंदे यांनी पारंपरिक बर्फी व्यावसायिक संदीप ढेंगे यांच्याकडून ती बनवून घेतली. बर्फीमध्ये कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह घातले जात नाहीत. फक्त दूध आटवून त्यात साखर घातली जाते व त्याच्या वड्या पाडल्या जातात. तलाठ्यांसमोर ही बर्फी बनवून त्याचे पॅकिंग करण्यात आले. ते स्वत: बर्फी देण्यासाठी मुंबईला गेले होते. या प्रक्रियेत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी समन्वयाचे काम केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Barfi Sweetens French President Macron's Palate During India Visit

Web Summary : During President Macron's India visit, Kolhapur's Thikpurli barfi was served. District officials ensured its quality, sending ten kilos after rigorous checks. Made without artificial colors, the traditional sweet delighted Macron and his delegation, highlighting Kolhapur's cultural and agricultural heritage.