शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'देश बहुमतानेच चालणार', न्यायमूर्तींच्या 'त्या' वादग्रस्त विधानाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:55 IST

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात दिलेल्या वादग्रस्त विधानाची सध्या चर्चा सुरू आहे.

Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) कार्यक्रमात दिलेल्या वादग्रस्त विधानाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. हे प्रकरण विचाराधीन असून, उच्च न्यायालयाकडून सविस्तर माहिती मागवण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने महटले आहे. दरम्यान, कॅम्पेन फॉर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी अँड रिफॉर्म्स (CJAR) ने भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली होती. 

या पत्रात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या वक्तव्याची अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी होईपर्यंत न्यायमूर्तींना सर्व न्यायालयीन कामकाजापासून दूर ठेवावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने शेखर कुमार यादव यांनी दिलेल्या भाषणाच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताकडे लक्ष वेधले असून, उच्च न्यायालयाकडून सविस्तर माहिती मागवली आहे.

काय म्हणाले होते न्यायमूर्ती यादव?"हा देश भारतात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या इच्छेनुसार चालवला जाईल, असे म्हणण्यास मला अजिबात संकोच वाटत नाही. हा कायदा आहे, कायदा नक्कीच बहुसंख्यकांनुसार चालतो. बहुसंख्य लोकांच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी तेच स्वीकारले जाईल," असे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव म्हणाले होते. समान नागरी संहिता (UCC) वर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. यावेळी उच्च न्यायालयाचे दुसरे न्यायाधीश न्यायमूर्ती दिनेश पाठक हेदेखील तिथे उपस्थित होते.

मुस्लिम समुदायावर निशाणायावेळी मुस्लीम समाजाचे नाव न घेता न्यायाधीश शेखर यादव म्हणाले की, "बहुपत्नीत्व, तिहेरी तलाक आणि हलाला यांसारख्या प्रथा अस्वीकार्य आहेत. जर तुम्ही म्हणाल की, आमचा वैयक्तिक कायदा त्याला परवानगी देतो, तर ते मान्य होणार नाही. तुम्ही महिलेचा अपमान करू शकत नाही. आपल्या धर्मग्रंथात आणि वेदांमध्ये महिलेला देवीचा दर्जा दिला आहे. तुम्ही चार बायका ठेवण्याचा किंवा तिहेरी तलाकचा हक्क सांगू शकत नाही," असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश