शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्ट म्हणाले, आमची कामकाजाची भाषा इंग्रजी, हिंदीतून बाजू मांडणाऱ्या याचिकाकर्त्याच्या मदतीसाठी दिला वकील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 08:55 IST

Supreme Court : सुप्रीम कोर्टामध्ये  सुनावणी सुरु असताना शुक्रवारी एक याचिकदार वकिलामार्फत नव्हे तर स्वत:च हिंदीमधून आपली बाजू मांडू लागला. परंतु त्यावेळी या न्यायालयाची कामकाजाची भाषा इंग्रजी आहे, असे खंडपीठाने त्याला सांगितले.

नवी दिल्ली :  सुप्रीम कोर्टामध्ये  सुनावणी सुरु असताना शुक्रवारी एक याचिकदार वकिलामार्फत नव्हे तर स्वत:च हिंदीमधून आपली बाजू मांडू लागला. परंतु त्यावेळी या न्यायालयाची कामकाजाची भाषा इंग्रजी आहे, असे खंडपीठाने त्याला सांगितले तसेच त्याला बाजू मांडण्याकरिता वकील उपलब्ध करून दिला.

रोजच्या प्रमाणे सुप्रीम कोर्टाचे कामकाज सुरु होताच शंकरलाल शर्मा या वयोवृद्ध याचिकादाराने त्यांच्या खटल्याचा पुकारा होताच सुप्रीम कोर्टासमाेर स्वत:च हिंदीतून आपली बाजू मांडण्यास सुरूवात केली. मात्र, यावेळी सुप्रीम कोर्टाचे इंग्रजीत सुरू असलेले कामकाज याचिकादाराला कळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर न्या. के. एम. जोसेफ व न्या. हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने शंकरलाल  शर्मा यांना वकील उपलब्ध करून दिला. न्यायालयाच्या कामकाजाची भाषा इंग्रजी आहे, असे शर्मा यांना खंडपीठाने सांगितले.

याचिकादाराने सुनावणीदरम्यान आपल्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत आपला खटला विविध न्यायालयांत चालला पण मला कुठेही न्याय मिळाला नाही, अशी शंकरलाल शर्मा यांची तक्रार होती. याचिकादार शंकरलाल शर्मा यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार असून वकिलांनी त्यांच्या प्रकरणाचा अभ्यास करून न्यायालयात बाजू मांडावी, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. 

प्रकरण गुंतागुंतीचेn तुमच्या प्रकरणाची फाईल आम्ही वाचली आहे. हे गुंतागुंतीचे प्रकरण असून स्वत: याचिकादार जे सांगत आहे ते नीट समजत नसल्याचे खंडपीठाने सांगितले. n त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना वकिलाची मदत उपलब्ध करून दिली. n त्यानुसार अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांनी शंकरलाल शर्मा यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्याचा अनुवाद करून न्यायालयासमोर याचिकादाराची बाजू मांडली.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयenglishइंग्रजी