शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेच्या सरनाम्यातील शब्दांना आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 05:28 IST

१९७६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४२ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट केले होते.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल देताना १९७६ च्या घटनादुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. या घटनादुरुस्तीत संविधानाच्या सरनाम्यात ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘अखंडता’ असे शब्द समाविष्ट करण्यात आले होते.

४४ वर्षांहून अधिक कालावधीनंतर या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने म्हटले की, समाजवादी व धर्मनिरपेक्ष यासारखे शब्द सरनाम्याचा अविभाज्य भाग आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले की, याला आव्हान देण्याचे कोणतेही कारण किंवा औचित्य आम्हाला सापडत नाही.न्यायमूर्ती संजय कुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सात पानांच्या आदेशात म्हटले आहे की, धर्मनिरपेक्षतेची संकल्पना समानतेच्या अधिकाराच्या पैलूंपैकी एक आहे. १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४२ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट केले होते. राज्यसभेचे माजी सदस्य सुब्रमण्यम स्वामी आणि विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. खंडपीठाने यावरील निकाल २२ नोव्हेंबर रोजी राखून ठेवला होता.

काय म्हटले आदेशात?

या आदेशात खंडपीठाने म्हटले आहे की, संविधान जिवंत दस्तऐवज आहे. संसदेला यात सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. भारताने धर्मनिरपेक्षतेची स्वतःची व्याख्या विकसित केली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय