शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार फूट उंचीवर असताना केबिनमध्ये धूर निघाल्याने स्पाईस जेटचे विमान माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 05:15 IST

दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या विमानातील घटना, विमानाने सुरक्षित लँडिंग केले. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाच्या केबिनमध्ये अचानक धूर निघू लागल्याने हे विमान दिल्लीला माघारी आले.

प्राप्त माहितीनुसार, विमान हवेत ५ हजार फूट उंचीवर असताना केबिनमध्ये धूर निघत असल्याचे विमान कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पायलटना त्याबाबत सांगितले. त्यानंतर विमान तातडीने दिल्लीकडे परत फिरविण्यात आले. विमानाने सुरक्षित लँडिंग केले. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना पर्यायी विमानाने जबलपूरला पाठविण्यात आले. विमानात किती प्रवासी होते, याची माहिती कळू शकली नाही. 

हवाई वाहतूक नियंत्रक ‘नागरी उड्डयन महाचालकां’नी (डीजीसीए) म्हटले आहे, स्पाईसजेटच्या क्यू ४०० विमानाच्या इंजिनमध्ये तेलाची गळती झाल्यामुळे धूर निघाला असावा, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मागील दोन आठवड्यांत स्पाईसजेटच्या विमानाबाबतीत घडलेली ही अशा प्रकारची पाचवी घटना आहे. 

यापूर्वींही इमर्जन्सी लँडिंग१९ जून रोजी पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी १८५ प्रवाशांसह उडालेल्या  स्पाईसजेटच्या विमानात उड्डाणानंतर लगेच आग लागली होती. त्यानंतर विमानाने काही मिनिटांतच  इमर्जन्सी लँडिंग केले होते. पक्षी धडकल्यामुळे विमानाच्या इंजिनला आग लागली होती, असे समजते. १९ जून रोजी जबलपूरला निघालेले एक विमान ‘केबिन दबावा’च्या समस्येमुळे दिल्लीला परत आणले गेले होते.२४ आणि २५ जून रोजी दोन विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. 

टॅग्स :airplaneविमान