शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रेल्वेचा वेग हाेणार ताशी २२० किमी! वंदे भारतही पडणार मागे, ५९ किलाेमीटरचा टेस्टिंग ट्रॅक हाेताेय तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 07:18 IST

भारतात वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वांत वेगवान रेल्वे विविध मार्गांवर सुरू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :

भारतात वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वांत वेगवान रेल्वे विविध मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. आता वंदे भारतपेक्षा जास्त वेगाने रेल्वे चालविण्याची तयारी भारतीय रेल्वेने सुरू केली आहे. या गाड्या ताशी २२० किमी एवढ्या वेगाने चालविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी राजस्थानमध्ये टेस्टिंग ट्रॅक विकसित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यावर सध्याच्या राेलिंग स्टाॅकचीही चाचणी शक्य हाेणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अशी सुविधा असलेला भारत पहिलाच देश ठरणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १८० किलाेमीटर एवढ्या वेगाने चाचणीदरम्यान धावली हाेती. ही गाडी सेमी हायस्पीड या श्रेणीमध्ये येते. भविष्यात ताशी २२० किमी वेगाने रेल्वे चालविण्याची याेजना आहे. 

असा असेल ट्रॅक२३ किमीचा हाय स्पीड मेन ट्रॅक राहणार आहे.१३ किमी हायस्पीड लूप ट्रॅक गुढा येथे असेल.३ किमीचा जलद टेस्टिंग लूप नवा येथे राहणार आहे.२० किमीचा कर्व्ह टेस्टिंग लूप उभारण्यात येईल.

या गाड्यांच्या चाचणीसाठी जाेधपूर विभागात गुढा-थथना मीठडी या दरम्यान ५९ किलाेमीटरचा टेस्टिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहे. त्याचा पहिला टप्पा यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण हाेणार असून, २०२४ च्या अखेरपर्यंत दुसरा टप्पादेखील पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

अशी हाेईल चाचणी- या टेस्ट ट्रॅकवर रेल्वे धावताना सर्व सुरक्षेचे मापदंड तपासण्यात येतील. त्यात स्टॅबिलिटी, व्हील ऑफलाेडिंग, ट्रॅक ओव्हरहेड इक्विपमेंट तसेच सिग्नलिंग यंत्रणांचा समावेश राहील. 

राेलिंग स्टाॅक म्हणजे काय?रेल्वेमध्ये नियमितपणे वापरण्यात येत असलेले काेच तसेच डब्यांना राेलिंग स्टाॅक म्हटले जाते. प्रवासी आणि माल गाडीचे डबे याचाच भाग आहेत. हाय स्पीड ट्रॅकवर यांचीही चाचणी रेल्वे करणार आहे.

भारतीय रेल्वेकडून येणाऱ्या काळात ॲल्युमिनियमचा वापर करून १०० ‘वंदे भारत’ची निर्मिती केली जाणार आहे. सध्या स्टेनलेस स्टीलपासून रेल्वे बनविण्यात येतात. ॲल्युमिनियमच्या गाड्या वजनाने हलक्या राहतात. त्या सहज ताशी २०० किमी वेगाने धावू शकतात.

ताशी २२० किमी वेगाने चाचणी पुरेसी नाही. सर्वप्रथम मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा यासारख्या प्रमुख मार्गांवर ट्रॅक अपग्रेड करण्याची गरज आहे.    - सुधांशू मणि, रचनाकार, वंदे भारत एक्स्प्रेस