शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 08:00 IST

श्रीनगरचे टूर ऑपरेटर मुश्ताक अहमद डार सांगतात, आधीच्या बुकिंग रद्द झाल्यानंतर केवळ १० टक्के बुकिंग आमच्याकडे उरले होते. अलीकडच्या सीमावर्ती तणावामुळे तेही शून्यावर आले आहे. 

सुरेश एस डुग्गर -

जम्मू : नियंत्रण रेषेवर (एलओसी) निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे काश्मीरमधील पर्यटन क्षेत्र पुन्हा एकदा गंभीर संकटात सापडले आहे. पर्यटन उद्योगातील लोकांच्या मते, ९० टक्के पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्याने पर्यटनावर उपजीविका भागवणाऱ्या स्थानिकांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. श्रीनगरचे टूर ऑपरेटर मुश्ताक अहमद डार सांगतात, आधीच्या बुकिंग रद्द झाल्यानंतर केवळ १० टक्के बुकिंग आमच्याकडे उरले होते. अलीकडच्या सीमावर्ती तणावामुळे तेही शून्यावर आले आहे. 

बैसरन हल्ल्याच्या धक्क्यातून सावरत असतानाच पुन्हा संकटात सापडलो आहोत. काश्मीरचा पर्यटन उद्योग राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७-८ टक्के थेट योगदान देतो. पर्यटकांची संख्या रोडावल्याने उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारणामुळे काही व्यावसायिक पर्यायी उत्पन्नाच्या शोधात इतरत्र स्थलांतर करत आहेत. हॉटेल व्यवसायक बिलाल हुसैन अमृतसरला गेले आहेत. 

पुरवठा साखळी विस्कळीतबैसरनमधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात अस्वस्थता निर्माण झाली असून, त्याचा प्रभाव अजूनही पर्यटन क्षेत्रावर जाणवत आहे, असे स्थानिक उद्योगजक सांगतात.

दल सरोवरातील हाउसबोट मालक शबनम भट यांच्यानुसार, बैसरन घटनेचा मोठा परिणाम अंतर्गत व्यवसाय व वाहतूक मार्गांवर झाला आहे. त्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. आम्ही आशा ठेवून होतो, पण सीमेवरील तणावाने तीही उद्ध्वस्त केली.

पंतप्रधान मोदींना साकडेहॉटेल चालक, गाईड्स, शिकारा चालक आणि हाउसबोट मालक या सर्वांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे की, त्यांनी पुढाकार घेऊन पर्यटकांना पुन्हा काश्मीरकडे आकर्षित करण्यासाठी मार्ग काढावा.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाtourismपर्यटनJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान