शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

अधिवेशनच गुंडाळणार! सलग सातव्या दिवशीही संसदेचे कामकाज ठप्प; वित्त विधेयक मंजूर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 10:27 IST

कामकाज  सलग सातव्या दिवशीही होऊ शकले नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली.

- संजय शर्मा

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ मार्चनंतर कधीही संपू शकते. अधिवेशनातील सर्वांत महत्त्वाचे वित्त विधेयक मंजूर करण्याचे काम २७ व २८ मार्च रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांत होऊ शकते. सरकार व विरोधकांतील संघर्ष पाहता त्यानंतर अधिवेशनाची सांगता होऊ शकते.कामकाज  सलग सातव्या दिवशीही होऊ शकले नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. विरोधक अदानी जेपीसीचा मुद्दा उपस्थित करीत राहिल्यास वित्त विधेयक पारित केल्यावर अधिवेशन समाप्त करावे, असे बैठकीत अनौपचारिकरीत्या ठरले.

बैठकीवर विरोधकांचा बहिष्कारसर्वपक्षीय बैठकीत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस व विरोधकांना सांगितले की, सत्ताधारी पक्ष राहुल गांधी यांच्या माफीची अट सोडत आहे. राहुल गांधी यांनीही संसदेत उत्तर देण्याची अट सोडावी. सत्ताधारी पक्ष व विरोधकांनी राजकीय लढाई संसदेच्या बाहेर लढावी व संसद चालू द्यावी. ओम बिर्ला यांच्या वक्तव्यानंतरही काँग्रेससह विरोधी पक्षांना हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्यामुळे जम्मू- काश्मीरचे बजेटही मंजूर होऊ शकले नाही. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्यापासून धनखड यांनी रोखल्याचा आरोप करीत हा बहिष्कार घालण्यात आला.

भाजप लोकशाहीचा मालक नाही : काँग्रेससत्ताधारी भाजप हे केवळ भाडेकरू असून, लोकशाहीचे मालक नाहीत, सरकारला जबाबदार धरणे म्हणजे देशावर टीका करणे नाही, अशी टीका काँग्रेसने केली.

उद्योगपती गौतम अदानी यांना वाचविण्यासाठी नेत्यांची फौज उभी राहिली आहे. हे सर्व मोदी यांच्या इशाऱ्यावरून होत आहे. पंतप्रधानांच्या मित्रांच्या गैरकृत्यांवर राहुल गांधी हे उत्तर मागत आहेत. त्यामुळेच हे नाट्य घडत आहे.  -पवन खेडा, काँग्रेसचे माध्यम व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख

राहुल गांधी यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागेल. सध्याच्या भारतीय राजकारणातील ते मीर जाफर आहेत. त्यांना नवाब व्हायचे आहे.- संबित पात्रा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते

संसदेत उत्तर देण्याचा अधिकार आहे. वैयक्तिक स्पष्टीकरणाला परवानगी आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या टिप्पण्यांबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी संसदेत नियम लागू केला होता. - राहुल गांधी

टॅग्स :Parliamentसंसद