शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या आठवड्यातही तिढाच; लोकसभेत गदारोळामध्ये एक विधेयक विनाचर्चा पारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 09:22 IST

गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज एकदा स्थगित केल्यानंतर दुपारी १२.३५ वाजता दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांत अदानी मुद्यावर संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) गठित करण्यावरून विरोधकांच्या मागणीसह विविध मुद्द्यांवरील तिढा बुधवारीही कायम राहिला. तथापि, लोकसभेत गदारोळामध्ये एक विधेयक विनाचर्चा पारित करण्यात आले. लोकसभा व राज्यसभा, या दोन्ही सभागृहांचे पुढील कामकाज तीन एप्रिल रोजी होणार आहे. 

गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज एकदा स्थगित केल्यानंतर दुपारी १२.३५ वाजता दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज एकदा स्थगित झाल्यानंतर दुपारी दोन वाजता दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात दोन्ही सभागृहात एकदाही प्रश्नोत्तराचा तास व शून्य प्रहराचे कामकाज सुरळीत झालेले नाही. दोन्ही सभागृहांना श्रीराम नवमीची सुटी आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवारी कोणत्याही प्रकारचे कामकाज केले जाणार नाही.  दरम्यान शनिवारी आणि रविवारी कामकाज होत नाही. त्यामुळे आता ३ एप्रिल रोजीच दोन्ही सभागृहांचे कामकाज करण्यात येणार आहे. 

उपासमारीने मृत्यूची नोंद नाहीदेशातील कोणतेही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात उपासमारीने मृत्यू झाल्याची एकही नोंद नाही, असे केंद्र सरकारने बुधवारी सांगितले. अन्नमंत्री पीयूष गोयल यांनी एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. खा. गजानन कीर्तीकर यांनी देशात अद्यापही उपासमारीने मृत्यूची समस्या भेडसावत आहे का, असा प्रश्न विचारला होता.

लोकसभेत स्पर्धा दुरुस्ती विधेयक मंजूर

  लोकसभेत स्पर्धा दुरुस्ती विधेयकाला विनाचर्चा मंजुरी देण्यात आली.   गेल्यावर्षी सभागृहात हे विधेयक सादर करण्यात आले होते.   अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात ठेवले.   कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने या विधेयकात काही दुरुस्त्या केल्या आहेत. यातील एक बदल उलाढालीच्या संदर्भातील असून, स्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्यास दंड लावण्यात येणार आहे.   लोकसभेने मंजूर केलेल्या सुधारणांनुसार व्यवसायाचा अर्थ एखादी व्यक्ती किंवा उद्योगातील सर्व उत्पादने व सेवांमधून काढला जातो.   स्पर्धेवर प्रतिकूल परिणाम होणाऱ्या पद्धतींना प्रतिबंध करण्यासाठी, बाजारातील स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि भारतातील इतर सहभागींद्वारे व्यापारात स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी, तसेच एका आयोगाची स्थापना करण्यासाठी स्पर्धा कायदा २००२ लागू करण्यात आलेला आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा