शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 21:26 IST

...आता जुलैअखेर निश्चित पगार त्याच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल.

श्रीराम जन्मभूमीमध्ये रामललांची अष्टयाम सेवा आणि पूजेसाठी नवनियुक्त 20 पुरोहितांचे वेतन निश्चित करण्यात आले आहे. हे वेतन जाहीर केले नसले तरी, यासंदर्भात पुजाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय तीर्थक्षेत्रातील कायमस्वरूपी पुजाऱ्यांना अनुज्ञेय सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही विश्वस्त मंडळाने माहिती दिली आहे. या पुजाऱ्यांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा दोन हजार रुपये मानधन दिले जात होते. आता जुलैअखेर निश्चित पगार त्याच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल.

यापूर्वी राम मंदिरचे मुख्य पुचारी आचार्य सत्येन्द्र दास शास्त्री यांच्याशिवाय, अशोक उपाध्याय, संतोष कुमार तिवारी, प्रदीप दास आणि प्रेम कुमार तिवारी हे चार सहायक पुजारी, तसेच कोठारी आणि भंडारी तथा एका सहायकाच्या वेतनात ऑक्टोबर 2023 मध्ये वाढ करण्यात आली होती. याशिवाय विविध प्रकारच्या सुविधांचीही घोषणा करण्यात आली होती. या सुविधा नव्या पुजाऱ्यांनाही देण्यात येतील.

सध्या, प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर नवनियुक्त पुजाऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र कार्यालयाशिवाय स्वतंत्र निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. कारण दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सुरू झाल्यावर संबंधित बॅचच्या प्रशिक्षणार्थींची व्यवस्था तेथे केली जाईल.

अँड्राइड फोनला परवानगी, पण... -श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने, पुजाऱ्यांनी मंदिरात अँड्रॉईड फोन वापरण्यावर घातलेली बंदी मागे घेतली आहे. यामुळे आता पुजारी मंदिराच्या आवारात अँड्रॉईड फोन घेऊन जाऊ शकतील. मात्र, त्यांना गर्भगृहात मोबाईल फोन वापरता येणार नाही. गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी पुजारी मोबाईल लॉकरमध्ये जमा करतील. गरज भासल्यास मंदिराबाहेर ते मोबाईलवर बोलू शकतील.

याशिवाय व्हीआयपी अथवा भाविकांना वेळेनुसार टिका-चंदन लावण्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नसेल. पण, कुठलाही पुजारी भाविकांनी दिलेल्या देणगीची रक्कम स्वीकारणार नाही. तो ती रक्कम दानपेटीत टाकण्याचे निर्देश देईल, असेही पुजाऱ्यांच्या बैठकीत सांगण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरTempleमंदिर